Sunday, June 23, 2024

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच जय भानुशालीने शेअर केला ‘बेडरूम’ फोटो, व्हायरल होतेय रोमॅंटिक पोस्ट

अभिनेता आणि सूत्रसंचालक जय भानुशाली या दिवसात चांगलाच चर्चेत आहे. नुकताच तो ‘बिग बॉस १५’ मधून बाहेर पडला आहे. बिग बॉसमध्ये जाताना त्याची तगडी फॅन फॉलोविंग होती. परंतु शोमध्ये तो काही खास कमाल करू शकला नाही. त्यामुळे त्याला बाहेर यावे लागले. परंतु आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तो जास्त खुश आहे. याची प्रचिती त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून येते. त्याने सोशल मीडियावर एक बेड रूममधील फोटो शेअर करा आहे. या फोटोमध्ये तो पत्नी माही आणि मुलगी तारासोबत दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहते खूप प्रेम दर्शवत आहेत.

जयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये, त्याच्या आनंदी कुटुंबाची एक झलक दिसत आहे. या फोटोमध्ये जय त्याची पत्नी माही आणि मुलगी तारासोबत बेडवर झोपलेला दिसत आहे. यावेळी जयचे डोळे बंद आहेत, पण माही तिचे प्रेम दाखवत आहे. माही जयच्या हातावर किस करताना दिसत आहे. तर तारा मम्मी पप्पाच्या मध्ये झोपलेली आहे. (Jay bhanushali shared bedroom photo, actor was seen sleeping with wife Mahi and daughter tara)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “कुटुंबासोबत आणि सकाळी सकाळी मला उठवण्यासाठी गाणे नाही. माझ्या खऱ्या आयुष्यासोबत, बिग बॉस माही वीज आणि तारा सोबत.” त्याच्या या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

याआधी जयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यावर त्याच्या पत्नीला भेटताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, जय घरी जात असतो परंतु मधेच त्याची पत्नी माही त्याला भेटते आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतात. बिग बॉसमध्ये असताना जयने त्याच्या पत्नीला आणि मुलीला खूप मिस केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा