Friday, July 12, 2024

‘या’ युजरने केली जया बच्चनची नक्कल, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल…

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींना मीडियावाल्यांचा अतोनात राग येत असतो, ते समोर आले की, अनेक कलाकरांची आणि अभिनत्रींची चिडचिड होते. काहींनी तर थेट समोरच त्यांना उत्तर देखिल दिले त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना देखिल करावा लागला होता. असाच प्रकार बॉलिवूडचे बिग बी यांची पत्नी जया बच्चन यांच्यासोबत घडला आहे.

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये युजर बॉलिवूड कलाकारांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. काही दिवसांपूर्वी एका मुलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलिया भट्ट (Aliya Bhatt) हिची नक्कर करताना दिसत होती. या व्हिडिओवर अनेक लोकांनी पसंती दर्शवली होती आणि व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा ती मुलगी म्हणजे एनाली सेरेज (Analee Cerejo) हिचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून तिने यामध्ये जया बच्चनची नक्कल केली आहे.

झाले असे की, कही दिवसांपूर्वी जया बच्चन यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या पॅपराजीवर खूप भडकल्या होत्या. व्हिडिओमध्ये जया बच्चन आपली नात नवेली नंदासोबत एका फॅशन शोमधून बाहेर आल्यावर तेव्हा त्यांना एकत्र अनेक पॅपराजीने घेरले होते. तेवढ्यात एक फोटोग्राफर पडता पडता वाचतो, तेव्हा जया त्याच्या तोंडावर म्हणतात की, “मी आशा करत आहे तु अजून जोरात आपट” जयाजी इथेच थांबत नाही तर त्या पुढे अजून फटकार लावतात आणि तेव्हा लगेच नव्या आपल्या आज्जीला शांत करण्यचा प्रयत्न करते. तेव्हा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Chic Shopper (@analeecerejo)

एनाली सेरेन हिने जया यांच्या व्हिडिओची नक्कल करत व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.यामध्ये तिने बोलण्याची पद्धत आणि मेकअप एकदम जया बच्चनसारखाच केला आहे. तिने देखिल व्हिडिओमध्ये सेम डायलॉग बोलले आहेत आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनदेखिल आहे तसेच दिले आहेत. ती सेम त्याच प्रकारे बोलताना दिसून येत आहे.

एमाली सेरेज हिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी पसंत केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 94 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखिल दिल्या आहेत. “एका युजरने लिहिले की, हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला पाहिजे ती सेम असंच करत असते.”, दुसऱ्याने लिहिले की, “ओएमजी, माझी जया आंटी.” अजून एकाने लिहिले की, “एवढे बरोबर आणि प्रफुल्लित करणारा, तुने तर मारुन टाकलं.”

या व्हिडिओला अनेकांनी चांगली प्रतिक्रया व्यक्त केली असून या व्हिडिओने सोशल मीडियावर कहर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

हे देखील वाचा