×

फायरक्रॅकर गाण्याच्या प्रदर्शनावेळी रणवीरने दीपिकावर स्तुतीसुमने उधळत व्यक्त केले प्रेम

सध्या रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. मागील बऱ्याच काळापासून रणवीरचा हा सिनेमा बज निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. आता या सिनेमातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे नाव आहे ‘फायरक्रॅकर.’ या गाण्याच्या लाँचला रणवीर सिंग पोहचला होता. या कार्यक्रमात त्याने पत्नी दीपिकाचे तोंडभरून खूपच कौतुक केले.

‘फायरक्रॅकर’ गाण्याच्या प्रदर्शनाच्या वेळी रणवीर सिंग अतिशय मजेशीर मूडमध्ये दिसला. यावेळी त्याने दीपिका पदुकोणचे कौतुक करत तिच्यावर स्तुती सुमने उधळली. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा या गाण्याच्या लॉन्चिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीरने एकाला लग्नावर प्रश्न विचारला आणि जेव्हा त्या व्यक्तीने तो अविवाहित असल्याचे सांगितले तेव्हा रणवीर लगेच म्हणाला, “लकी मॅन” त्यावर उपस्थित सर्व लोकं हसले, मात्र लगेचच रणवीर म्हणाला, “लकी तर मी आहे, माझ्या घरी लक्ष्मी आहे. जय झूलेलाल, जय झूलेलाल. जेंव्हापासुन बेबी माझ्या लाईफमध्ये आली तेव्हापासून मी वेग पकडला आहे. २०१२…तर आता मला आणि माझ्या बेबीला सोबत दहा वर्ष झाली.”

View this post on Instagram

A post shared by One World News – Infotainment (@oneworldnewscom)

पुढे रणवीर म्हणाला की, “ती माझी फायरक्रॅकर आहे. या गोष्टीसोबत सर्वच सहमत असतील की ती फायरक्रॅकर आहे. २०१२ यार जरा विचार करा १० वर्ष झाले. काय लक आहे माझे. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मी लाईनवर आलो आणि माझ्या गाडीने तुफान वेग पकडला आहे.”

रणवीर सिंगचा आगामी ‘जयेशभाई जोरदार’ हा गुजराती कुटुंबाची कहाणी असलेला सिनेमा मुलींच्या जन्मावर आधारित असून, मुलाच्या जन्मासाठी हट्ट करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर भाष्य करतो. यात रणवीरसोबतच बोमन इराणी, रत्ना पाठक शाह, शालिनी पांडे आदी कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post