लईच वाईट झालं यार! हॉलिवूड अभिनेत्रीने मोडले बेसबॉलपटूशी होणारे लग्न, दोन वर्षे केले होते एकमेकांना डेट

jennifer lopez and alex rodriguez call off 2 year of engagement?


हॉलिवूड अभिनेत्री व गायक जेनिफर लोपेझ आणि बेसबॉलपटू ऍलेक्स रोड्रिगेज यांनी त्यांचे होणारे लग्न मोडले आहे. जेनिफर आणि ऍलेक्स जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण आता त्यांचे नाते संपले आहे. हे जोडपे विभक्त झाल्याची बातमी समोर आली आहे, ज्यात सांगितले गेले की दोघे आता एकत्र राहत नाहीत. ऍलेक्सच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले की, तो सध्या मियामीमध्ये बेसबॉल हंगामाची तयारी करत आहे, तर जेनिफर डॉमनिकन रिपब्लिकमध्ये तिच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे.

सन 2005 मध्ये क्वीन्सच्या शिया स्टेडियमवर दोघांची प्रथम भेट झाली होती. जेनिफर आणि ऍलेक्स यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मार्च 2019 मध्ये साखरपुडा केला होता. ऍलेक्सने जेनिफरच्या हातात एक मोठी अंगठी घातलेला एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत त्याने लिहले होते, “ती हो म्हणाली.” त्याचवेळी, जेनिफरने देखील तीच पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती.

साखरपुडा झाल्यानंतर दोघे लग्नही करणार होते. पण कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. इतकेच नव्हे तर कोरोनाच्या समस्येमुळे त्यांना हे लग्न दोनदा पुढे ढकलावे लागले. त्याचवेळी आता त्यांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहते खूप निराश झाले आहेत.

‘इन लिव्हिंग कलर’ या टेलिव्हिजन कॉमेडी प्रोग्राममधून जेनिफरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. नंतर तिने ‘सेलिना’, ‘आऊट ऑफ साईट’ आणि ‘एंजल आईस’ यात काम केला. ज्यासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अल्मा पुरस्काराने गौरविण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जान्हवीच्या मॅनेजरने केला चाहत्यासोबत गैरव्यवहार; पाहून जान्हवीने केले असे काही, व्हिडिओ व्हायरल

-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.