इंस्टाग्रामवर 28 मिलियनहून अधिक फॉलोवर्स असलेला फैजल शेख ‘झलक दिखला जा 10’ मध्ये धुमाकूळ घालत आहे. याआधी ‘खतरों के खिलाड़ी 12’ मध्ये फैजलच्या जबरदस्त स्टंटला बघून प्रेक्षक वेडे झाले हाेते. परंतु फैजल आज ज्या स्थानावर आहे तिथे पाेहचणे साेप्पे नव्हते. फैजल अवघ्या 15-20 सेंकदचा व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांच मनाेरंजन करत असे. फैजलने त्याच्या करीअरची सुरुवात टिकटाॅक या माध्यमातून केली. फैजला टीकटाॅकवरून फार प्रसिद्धी मिळाली. फैजलचा टीक टाॅकवर राताेरात इतका चाहता वर्ग वाढला की, ताे प्रसिद्धीच्या झाेतात आला. मात्र, त्याचा प्रवास साेप्पा नव्हता. फैजलला अनेक संघर्षाला समाेर जावे लागले.
राेडवर कपडे विकायचा फैजल
‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) शाे मध्ये फैजलने (Faisal Shaikh) आपल्या परफॉर्मन्सद्वारे खुलासा केला की, सोशल मीडियावर स्टार बनण्याचा प्रवास साेप्पा नव्हता. फैजलने सांगितले की, ताे राेडवर पहिले कपडे विकण्याचे काम करत असे. फैजल शेख आपल्या स्ट्रगलविषयी सांगत भावूक झाला हाेता. ताे पुढे म्हणाला, “मी जेव्हा रील्स बनवायला सुरुवात केली त्यावेळी त्याच्याकडे इंटरनेट डाटा देखील राहत नव्हता.”
फैजलला जिममध्ये आहे रुची
फैजल त्यावेळी 50 ते 100 रुपयांचा रिचार्ज टाकत आणि मग व्हिडिओ अपलाेड करत असे. फैजलचा संघर्षाचा काळ बऱ्याच वेळ चालला आणि यादरम्यान त्याला ट्राेलिंगचाही सामना करावा लागला. मात्र, फैजलच्या डाेक्यात त्याला काय करायच आहे हे ठरलेलं हाेतं. झलकच्या मंचावर फैजूच्या बहिनीने सांगितल की, “ताे जेवण करण्यासाठी देखील घरी येत नसे. इतकंच नाहीतर ताे त्याच्या कामासाठी शेवटचा क्लास देखील करत नसे. फैजल कामा व्यतिरिक्त कशात रुची असेल तर ती जिममध्ये.” यावेळी मंचावर माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि करण जौहर उपस्थित हाेते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! गर्दीत अडकलेल्या रणवीर सिंगला खावी लागली कानाखाली, पण कुणी केलं हे कृत्य?
‘मणिके मागे हिथे’ गाण्याचे हिंदी वर्जन येणार, पहिली झलक पाहूनच व्हाल फिदा
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात