Friday, March 29, 2024

एकमेकांना डेट करतायेत का फैजल शेख अन् जन्नत झुबेर? अभिनेत्याने नात्याबाबत केला मोठा खुलासा

जन्नत झुबेर (Jannat Zubair) आणि फैजल शेख (Faisal Sheikh) यांना सोशल मीडियावर जेव्हाही चाहते एकत्र पाहतात, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न पडतो, हे दोघे नात्यात आहेत का? जन्नत आणि फैसल यांची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन जोडी सध्या इंडस्ट्रीत चर्चेचे कारण बनली आहे. मात्र दोघे नेहमी सांगतात की, ते फक्त चांगले मित्र आहेत. जन्नत जुबेरचे नाव फैजल शेखसोबत काही वर्षांपूर्वी जोडले गेले होते. जेव्हा दोघे एका गाण्यात एकत्र दिसले होते. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती, तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

‘खतरों के खिलाडी १२’मध्ये एकत्र दिसणार फैजल आणि जन्नत
यादरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नाराजीही व्यक्त केली होती. तसेच तिचे नाव अशा प्रकारे जोडणे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले होते. पुन्हा एकदा दोघेही स्टंट बेल्टेड रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी १२’ मध्ये दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान फैजल शेखने जन्नत झुबेरसोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दल मोकळेपणाने सांगितले. फैजल म्हणाला की, शोमध्ये त्याला त्याची मैत्रिण जन्नत झुबेरकडून नक्कीच भावनिक पाठिंबा मिळू शकतो. फैजल शेख म्हणाला, तिथे जन्नत असेल, तर चाहत्यांना पुन्हा आम्हाला एकत्र पाहतील. अखेर आमच्यापैकी कोण चांगली कामगिरी करेल, हे पाहणे रंजक ठरेल.” (faisal shaikh opened up about relationship with jannat zubair)

फैजलने सांगितली जन्नतसोबतच्या नातेसंबंधाची सत्यता
रिलेशनशीपबद्दल विचारले असता फैजल म्हणाला, ” आम्ही बऱ्याच वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही दोघांनी मिळून अनेक प्रकल्पांवर काम केले आहे आणि पुढेही करत राहू. अनेकांना असे वाटते, पण असे काहीही नाही. ऑनस्क्रीन केमिस्ट्री असते, तशीच ऑफस्क्रीन असावी असं अजिबात नाही. आम्ही दोघे ऑफस्क्रीन खूप चांगले मित्र आहोत आणि मी सिंगल आहे.”

जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच पंजाबी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा