Saturday, June 29, 2024

‘झिम्मा २’चे चित्रपटगृहात अर्धशतक; हेमंत ढोमे म्हणाला, ‘हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता’

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे.

कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा 2023 मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे.

‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दलबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ झिम्मा २ चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून आपल्या सर्वांचा आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी ‘झिम्मा २’ ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिषेक बच्चनच्या ‘गुरू’ चित्रपटाला झाली 17 वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी
अजय देवगणच्या ‘रेड 2’ चित्रपटात रितेश देशमुखची एन्ट्री, पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता

हे देखील वाचा