वयाच्या २५व्या वर्षीच जगाचा निरोप घेतलेल्या गजनीच्या ‘त्या’ अभिनेत्रीच्या आत्महत्येचे कारण अजूनही आले नाही समोर


बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा 20 फेब्रुवारीला वाढदिवस असतो. 3 जून 2013 रोजी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने जगाला निरोप दिला. जिया खानचा मृत्यू आजही एक रहस्य आहे. तिच्या मृत्यूचे अद्यापही निराकरण झालेले नाही. जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. तिच्या नावावर फक्त तीन चित्रपट आहेत. परंतू तिचा अभिनय इतका प्रभावी होता की, प्रेक्षक आजही तिला विसरू शकले नाहीत.

आपल्या पदार्पणात जिया खानने बीग बी अमिताभ बच्चनसोबत काम केले. जेव्हा त्या चित्रपटाला विरोध झाला तेव्हा जियाचे नावही त्यात आले होते. यामुळे प्रेक्षक तिला पहिल्या चित्रपटापासूनच ओळखू लागले. त्यानंतर तिने आमिर खानसमवेत ‘गजनी’ आणि नंतर ‘हाऊसफुल’मध्ये अक्षय कुमारच्या विरुद्ध पात्र साकारले. अशा मोठ्या कलाकारांसोबत काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, जियाची स्वप्ने कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला पुर्ण झाली.

आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली जीयासोबत नात्यात होता. त्यांचे हे नाते अगदी उघड होते. त्यांच्या घरातील व्यक्तींनाही याबद्दल माहित होते. पण त्यांच्या दरम्यान काहीतरी असे होते, जे अपूर्ण होते. प्रेमात असुनही जिया तिच्या आयुष्यात एकटी होती. या नात्यासाठी जियाची आई राबिया विशेषतः खूश नव्हती. पण राबिया मुलीच्या आनंदापुढे काहीही बोलली नाही. काही दिवसांनंतर या नात्यातील दुरावा वाढू लागला.

त्यानंतर 3 जून 2013 रोजी जिया खानने आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या घरात फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राणासोबत तिच्या स्वप्नांचाही चक्काचुर झाला. केवळ 25 वर्षांच्या जियाने सर्वांचा निरोप घेतला होता. मृत्यूपूर्वी शेवटच्या वेळेस जियाचे सूरजशी बोलणे झाले होते. यामुळे पोलिसांनी सूरजला अटक केली. त्यानंतर सूरज 23 दिवस तुरूंगात राहिला. नंतर त्याला जामीन मिळाला. जियाच्या मृत्यूला सात वर्षे लोटली तरी अजूनही मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नाही.

आज जिया खान आपल्यात नाही पण तिने तिच्या छोट्या कारकीर्दीत खूप प्रभावी काम केले. 2013 मध्ये तिने स्वत: चे आयुष्य संपवले, पण तरीही तिच्या चाहत्यांच्या मनात ती आजही जिवंत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.