अंकिताच्या लग्नात हळद खेळण्यासाठी अमृता खानविलकरने केले आवडत्या साडीला गुडबाय, म्हणाली…


‘वाजले की बारा’, म्हणत जिने आख्या महाराष्ट्राला नाचायला भाग पाडले होते ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर होय. तिने तिच्या अभिनयाने आणि खास करून नृत्यकौशल्याने सगळ्यांची मने जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर देखील मोठया प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अमृता एक फिटनेस प्रेमी आहे. तिचे जिममधील अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. अशातच तिचा आणखी एक दिलखेचक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने साडी नेसलेली आहे. त्याचे कारण देखील तेवढेच खास आहे. ते म्हणजे तिच्या जवळच्या मैत्रिणीचे लग्न आहे. 

मागील अनेक दिवसापासून अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या लग्नाची चर्चा चालू आहे. ती तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार आहे. नुकतेच अंकिता आणि विकीच्या लग्नाची हळद आणि मेहेंदी कार्यक्रम झाला आहे. तिच्या मेहेंदी आणि हळदीच्या कार्यक्रमात अमृता आणि अभिज्ञा भावेने हजेरी लावली आहे. त्याच साडीवरील एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Amruta Khanvilkar share her dance video on social media)

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा फ्रिलचा ब्लाउज घातला आहे. तिने केसांची पोनीटेल घालून कानात मोठे इअरिंग घातले आहेत. तसेच डोळ्यांवर चष्मा लावला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘चका चक’ हे गाणे लागले आहे. या व्हिडिओमध्ये ती जोरदार डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडत्या साडीला गुडबाय म्हणायचे असते, कारण आज हळदी आहे.” तिच्या या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा डान्स व्हिडिओ अनेकांना आवडला आहे.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

अजूनही वेड लावतोय ‘चटक मटक’ गाण्यातील सपनाचा भन्नाट डान्स, मिळवले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत मधुरा वेलणकर साकारणार अनोखी भूमिका, प्रोमो आला समोर

‘कोणा-कोणाच्या घरात आज न्यूजपेपर आला नाही,’ भन्नाट फोटोवर शालूचीच भन्नाट कमेंट


Latest Post

error: Content is protected !!