Thursday, March 28, 2024

बहिणीच्या मिठीत ‘जीव झाला येडा पिसा’ फेम सिद्धीला कोसळले रडू, भावनिक पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. या मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिकेत शिवा आणि सिद्धीची सुंदर लवस्टोरी दाखवण्यात आली होती.यामध्ये सिद्धीच्या भूमिकेतील अभिनेत्री विदुला चौगुलेला (Vidula Chogule) प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मालिका संपली तरी विदुला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती बहिणीला निरोप देताना रडायला लागल्याचे दिसत आहे. काय आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

विदुला चौगुले ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जीव झाला येडापिसा या मालिकेने विदुलाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेतील तिची सिद्धीची भूमिका प्रचंड गाजली होती. सध्या सिद्धीची मालिका बंद असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या विदुलाच्या अशाच एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये विदुला आपल्या बहिणीच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Ce_WZ47PVa7/?utm_source=ig_web_copy_link

वास्तविक विदुला चौगुले सुट्टीसाठी आपल्या बहिणीकडे मेलबर्नला गेली होती. यावेळी विदुलाने तिच्या या सुट्टीचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले आहेत ज्यामुळे तिने तिची सुट्टी चांगलीच आनंदात घालवल्याचे दिसत आहे. नुकतीच विदुला सुट्टी संपवून मायदेशी परतली परंतु यावेळी बहिणीला निरोप देताना दोघीही चांगल्याच भावूक झाल्याचे विदुलाच्या पोस्टमध्ये दिसत आहे. तिच्या या पोस्टमध्ये दोघीही रडताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विदुलाने मी किती भाग्यवान आहे, कुणाला तरी निरोप देताना इतके दुःख होत आहे, असा कॅप्शन दिला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा