जॉनी लिव्हरच्या मुलांनी केला सुपरस्टार विजयच्या ‘वाथी कमिंग’ गाण्यावर जबराट डान्स, एकदा पाहाच

Jonny Lever Daughter Jamie Lever Dance With Brother Jesse Lever On Thalapathy Vijay Song Vaathi Coming Song


बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियनचे नाव सांगा, असे म्हटल्यावर सर्वांच्या मुखात सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे ‘जॉनी लिव्हर’. जॉनी लिव्हरप्रमाणेेच त्याची मुलेही चांगलीच प्रसिद्ध आहेत. त्याची मुलगी जेमी लिव्हर सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असून ती आपल्या पोस्टने धमाल करत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या भावासोबत डान्स करताना दिसत आहे.

खरं तर जेमीने टॉलिवूड सुपरस्टार थालापती विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. जेमी लिव्हरचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे.

जेमी लिव्हर आणि तिचा भाऊ जेस्सी लिव्हरने आपला हा डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत बहीण- भावाची जोडी अफलातून डान्स करताना दिसत आहे. यातील स्टेप्सही विजयच्या ‘वाथी कमिंग’ गाण्याप्रमाणेच आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसं पाहिलं तर ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर भरपूर व्हिडिओ बनवले जात आहेत.

जेमी लिव्हर यापूर्वीही आपले वडील म्हणजेच जॉनी लिव्हरसोबत कॉमेडी व्हिडिओ बनवले होते.

जेमीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात सन २०१२ मध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून केली होती. तिने बॉलिवूडमधील ‘किस किसको प्यार करू’ आणि ‘हाऊसफुल ४’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने या चित्रपटांमध्ये चंपा आणि गिगली या भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ

-टिशू झाला इशू! गर्दीचा फायदा घेऊन दिपीकाची पर्स खेचण्याचा घडला प्रकार, घटनेचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.