Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड ‘आपल्याला काहीच वाटत नाही का?’, मुंबईत वाढत्या प्रदुषणावर जुहीने चावलाने केला प्रश्न

‘आपल्याला काहीच वाटत नाही का?’, मुंबईत वाढत्या प्रदुषणावर जुहीने चावलाने केला प्रश्न

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जुही चावला हिने 80/90 च्या दशकामध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने ‘कयामत से कयामत कायामत तक’, ‘डर’, इश्क, सारख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. आता जरी ती अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्याचे मनोरंजन करत असते. आपल्या अभिनयासोबतच ती सतत वेगवेगळ्या गोष्टींवर आपले मत मांडत असते. तिने नुकतंच राज्याची राजधानी मुंबईवर केलेल्या ट्वीटमुळे अभिनेत्री चर्चेचा विषयी बनली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla हिने 80-90 च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनार अधिराज्य गाजवले आहे. मात्र, ती सध्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी देखिल जुहीने 5जी वरुन केलेल्या ट्वीटमुळे तिला न्यालयाने फटकारले होते, पण तिने पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

जुहीने मुंबईच्या पर्यवरणावर बोलत असताना ट्वीटमध्ये लिहिले की, “तुमच्यापैकी कुणी लक्ष दिलं आहे का? ते म्हणजे हल्ली मुंबईची हवा किती खराब झाली आहे. आपण जेव्हा खाडीवरुन प्रवास करतो तेव्हा तर नाकावर हात ठेवून प्रवास करावा लागतो. किती दुर्गंधी सुटलीये. प्रदुषित झालेलं पाणी वरळी आणि बांद्रामधून थेट मिठी नदीत जात आहे. याचं आपल्याला काहीच वाटत नाही का? असा प्रश्न तिने मुंबईत राहणाऱ्या अनेक लोकांना विचारला आहे.

जुहीच्या ट्वीटवरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकताच दिवाळी सण लोकांनी जोरात साजरी केला. मात्र, त्याचे मुंबईवर होणाऱ्या परिणामावर कोणीच लक्ष दिले नाही. राजकीय पक्षाने फटाके वाजविण्यावरुन दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच दिशेला भरकटल्या आणि त्याचे नुकसान मुंबईत राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे. आता दक्षिण मुंबईतील वातावरण जिवघेणे झाले आहे. असे जुहीने आपल्या ट्वाटद्वारे म्हटले आहे.

जुहीने आपल्या ट्वीटद्वारे मुंबईकरांना मुंबई प्रदुषणापासून वाचवण्याचा संदेश दिला आहे. दिवाळीनंतर मुंबईमधल्या हवेमध्ये खूपच प्रदुषण पसरले आहे. हवेमध्ये श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यावर लवकरात लवकर उपाय करणे खूपच गरजेचे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतानंतर जपानमध्ये RRR ने फडकवला झेंडा, अभिनेत्याने टांझानियात केले सेलिब्रेशन
किशोर दावर प्रभावित होते अभिजीत भट्टाचार्य, तर ‘या’ कारणामुळे शाहरुख खानसाठी गाणं केलं होतं बंद

हे देखील वाचा