Friday, April 19, 2024

ज्येष्ठ अभिनेत्याला आधीच ठाऊक होतं मुलाच्या मृत्यूबद्दल… तरीही नाही वाचवू शकले मुलाचे प्राण!

बॉलिवूडमधील कलाकारांना आपण जेव्हा लाईम लाईट मध्ये वावरताना पाहतो तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्यांचा हेवा वाटणं हे साहजिकच आहे. या बॉलिवूडवाल्यांचं लाइफस्टाइल किती भारी आहे राव! कसलंच टेंशन नाही किंवा कोणती अडचण नाही… हे विचार आपल्या मनात सहज येऊन जातात. परंतु बऱ्याचदा दिसतं तसं नसतं मंडळी! बॉलिवूडच्या झगमगाटाच्या आड या कलाकारांना त्यांची दुःख, वेदना यांना लपवावंच लागतं. अगदीच या भावना ओसंडून गेल्यावर आपल्याला त्या दिसू लागतात.

बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार कबीर बेदी यांनी देखील बॉलिवूडमध्ये आतापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. परंतु खऱ्या आयुष्यात त्यांच्यासाठी परिस्थितीतच खलनायक ठरली. असा एक प्रसंग आला होता जेव्हा कबीर जी हे आतून पूर्णपणे तुटले होते. त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. हा प्रसंग नेमका काय होता आणि कबीर जी त्यातून बाहेर कसे पडले हे आज आपण पाहणार आहोत.

कबीर बेदी यांच्या आयुष्यात एक असा वाईट काळ आला जेव्हा त्यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. कबीरजींना हे आधीपासूनच ठाऊक देखील होतं परंतु ते काहीच करू शकले नाहीत. ते हतबल आणि निराश झाले होते. कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थ याने वयाच्या २६ व्या वर्षी १९९७ साली आत्महत्या केली. त्या दिवशी मुलाच्या मृतदेहाला खांदा देताना कबीर आतून पूर्णपणे तुटले होते. मुलाखतीत कबीर बेदी यांनीही आपल्या मुलाच्या आत्महत्येविषयी माहिती असल्याचे उघड केले होते, परंतु ते त्याला रोखू शकले नाहीत. हीच वेदना त्यांच्या हृदयात आजपर्यंत बाभळीच्या काट्याप्रमाणे सलत आहे.

कबीर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा पुढील शिक्षणासाठी नॉर्थ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता. परंतु अचानक काय झालं काही ठाऊक नाही अभ्यासादरम्यान सिद्धार्थ हा डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. त्याला सिजोफ्रेनिया हा आजार झाला होता. कबीर यांनी त्याला बरं करण्यासाठी खूप खचता खाल्ल्या परंतु कुठलंच औषध किंवा कोणतेही उपचार त्याला यातून बरं करू शकले नाहीत. एक दिवस अचानक त्याने त्याच्या मित्रांना मेल केला आणि स्वतः आत्महत्या केली. काही दिवसांपासून त्याच्या मनात हे विचार सतत येत होते आणि अखेर त्याने हे पाऊल उचललं. जेव्हा ही बातमी कबीर यांच्या घरी समजली तेव्हा कबीर यांना दुहेरी धक्का बसला. कारण सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची आई तसेच कबीर यांच्या पहिल्या पत्नी प्रतिमा बेदी यांनी देखील आपले प्राण सोडले.

कबीर बेदी यांनी फक्त बॉलीवूडमध्येच नव्हे ते इटालियन टीव्ही शो संदुकान मध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्यांनी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख दिली ती म्हणजे राकेश रोशन यांच्या खून भारी मांग या सिनेमाने! यानंतर काईट, मोहेंजोदडो, चक्रव्यूह अशा सिनेमांमधून काम केलं आहे.

हे देखील वाचा