Tuesday, June 25, 2024

बाप रे! ‘कबीर सिंग’ फेम निकिता दत्तासोबत भररस्त्यात घडली ‘ही’ धक्कादायक घटना, अजूनही घाबरलेलीय अभिनेत्री

अभिनेत्री निकिता दत्ताने ‘कबीर सिंग’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. छोटे पण महत्वाचे पात्र साकारून तिने बरीच वाहवा मिळवली. आता अभिनेत्रीने नुकतेच तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामुळे ती चांगलीच हादरली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिचे सामान तिच्याकडून उघडपणे हिसकावले गेले आणि या घटनेनंतर ती थोडी घाबरली आहे.

निकिताचा वाईट अनुभव
टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ताने अलीकडेच मुंबईच्या रस्त्यावर तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला. अभिनेत्रीने खुलासा केला की, ती वांद्रे (मुंबई)च्या रस्त्याने चालत असताना तिचा फोन हिसकावण्यात आला. आपला अनुभव शेअर करत अभिनेत्रीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी तिला मदत केली त्यांचे आभारही मानले. (kabir khan actress nikita dutta phone was snatched at bandra)

भररस्त्यात हिसकावण्यात आला फोन
आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत, निकिता दत्ताने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. खुलासा करत तिने लिहिले की, “मी कालचा एक दुःखद अनुभव शेअर करत आहे, जो खूप नाट्यमय होता आणि त्यामुळे मला २४ तास कठीण गेले. मी संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास वांद्रे येथील १४ व्या लेनवरून चालले होते. तेव्हा दुचाकीवरून दोघेजण आले. पाठीमागून एकाने माझ्या डोक्यावर थाप मारली, ज्यामुळे माझे लक्ष क्षणभर विचलित झाले आणि मागे बसलेल्या व्यक्तीने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला. असे केल्यावर ते पुढे जात होते. त्यामुळे मी काही करण्याआधीच ते पळून गेले.”

पळून जाण्यात यशस्वी झाले चोरटे
निकिताने पुढे खुलासा केला की, या घटनेने तिला धक्काच बसला. तिला क्षणभर काहीच समजले नाही. ती परत येईपर्यंत चोरटे पळून गेले होते. निकिता दत्ताने असेही सांगितले की, तिला रस्त्यावर चालणाऱ्यांचा पाठिंबा मिळाला. तिने लिहिले, “आजूबाजूला फिरणारे लोक मदतीसाठी धावू लागले, अनेकांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. पण सर्व प्रयत्न फसले आणि ते लोक तेथून पळून गेले.”

फॉर्मलिटी केली पूर्ण
निकिता पुढे म्हणाली, “या घटनेतील जी असहायता आणि राग मी अनुभवला, त्यामुळे मी खूपच घाबरले होते.” निकिता दत्ताने मदतीसाठी पुढे आलेल्या लोकांचे आभार मानले. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, तिने सर्व आवश्यक फॉर्मलिटीज पूर्ण केल्या आहेत. सोबतच, निकिताने आशा व्यक्त केली की, हे इतर कोणाच्या बाबतीत कधीही होणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा