×

नादच खुळा! शेंगदाणे विकणाऱ्या भुबनच्या गाण्याचा युट्यूबवर राडा; मिळाले ‘इतके’ कोटी व्ह्यूज

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे लोकांना एखाद्या व्यक्तीची कला आवडली की, मग ते त्यांना डोक्यावर घेतात.  मग ते गाणे असो, डान्स असो किंवा इतर काहीही. मागील काही दिवसांपूर्वी असेच एक गाणे व्हायरल झाले होते. या गाण्याने लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. त्या गाण्यावर व्हिडिओ, रील्स मोठ्या प्रमाणात तयार केले गेले होते आणि अजूनही केले जात आहेत. ते गाणे इतर कोणते नसून ‘कच्चा बदाम’ हे आहे. शेंगदाणे विकणाऱ्या एका व्यक्तीने हे गाणे गायले होते. त्यानंतर या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन तयार करण्यात आले. हे रिमिक्स गाणे युट्यूबवर अक्षरश: राडा घालत आहे.

खरं तर, हे गाणे बाजेवाला रेकॉर्ड्स हरियाणवी या युट्यूब चॅनेलवर ५ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यात खुद्द गाण्याचा गायक भुबन बड्याकरही (Bhuban Badyakar) दिसत आहे. या गाण्याला आतापर्यंत ११ कोटी आणि २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त या व्हिडिओवर २२ लाख लाईक्सचा पाऊसही पडला आहे. इतकेच नाही, तर या व्हिडिओवर ३६ हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.

‘कच्चा बदाम’ या गाण्याने लोकप्रियता मिळाल्यानंतर भूबन ने त्याचा हा प्रवास त्याला एका स्वप्नासारखा वाटतोय असे सांगितले. त्याने सांगितले की, “मी आज इथे तुमच्या मध्ये येऊन खूप खुश आहे.”

भुबन बड्याकर हा अत्यंत गरीब घरातील व्यक्ती आहे. एकेकाळी त्याला त्याच्या कुटुंबाला दोन वेळचे दोन जेवण देखील मिळत नव्हते. परंतु आता त्याच्या कलेच्या जोरावर त्याने नाव पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

यासोबतच भुबनला त्याच्या कलागुणांसाठी पश्चिम बंगाल पोलिसांनीही गौरविले आहे. भुबनचे पोलिसांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भुबन हा पश्चिम बंगालच्या कुरलगुरी गावात राहणारा गरीब व्यक्ती आहे. पोट भरण्यासाठी भुबन गावातील रस्त्यांवर शेंगदाणे विकायचा. भुबन सायकलवर पिशवी घेऊन रस्त्यात सामंजस्याने शेंगदाणे विकायचे. ते क्रिएटिव्ह पद्धतीने विकण्यासाठी भुबनने ‘कच्चा बदाम’ हे गाणे तयार केले होते, जे व्हायरल झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही  वाचा-

Latest Post