‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव म्हणतेय, ‘आताच बया का बावरलं?’ त्यावर चाहत्यांच्या उमटतायेत प्रतिक्रिया


‘काहे दिया परदेस’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. सोबतच मालिकेत अभिनय करून अभिनेत्री सायली संजीव देखील घराघरात पोहचली. तिच्या निरागस अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तसेच अभिनेत्री या दिवसात सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाली आहे. बऱ्याचदा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना चाहत्यांकडून खूप प्रेमही मिळते.

अलीकडेच सायलीने शेअर केलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सैराटमधील ‘आताच बया का’ या गाण्यावर अभिनय केला आहे. व्हिडिओमधील सायलीचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. तिचा गोडगोंडस चेहरा पुन्हा एकदा नव्याने चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडत आहे.

सायलीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच व्हिडिओखाली कमेंट करून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, “किती गोड दिसतेय सायली.” दुसऱ्याने लिहिले, “खूपच सुंदर.” याशिवाय इतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट केले आहेत.

झी मराठी चॅनलवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने ‘गौरी’ची भूमिका साकारली होती. ‘गौरी’ची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलिस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ढोल कुणाचा वाजं जी…!’ गाण्याचा तालावर झोका घेताना दिसली अनुष्का सरकटे; ब्लॅक ऍंड व्हाईट व्हिडिओला चाहत्यांची पसंती

-‘पुन्हा अभिनेत्रीसोबच डान्स केला तर धुलाई करेन…’ अंशुमन विचारेच्या लाडकीने दिली त्याला धमकी

-‘जलपरी’ बनून सारा अली खानने मारली होती समुद्रात उडी; व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहाच


Leave A Reply

Your email address will not be published.