Saturday, June 29, 2024

मोठ्या मनाची अभिनेत्री! कॉलेजची फी भरण्यासाठी विद्यार्थीनीने मागितली काजल अग्रवालकडे मदत, तिनेही लगेच केले ‘इतके’ रुपये ट्रान्सफर

चित्रपटसृष्टीत काम करणारे काही कलाकार केवळ अभिनय करत नाहीत, तर लाखोंच्या मनावर राज्य देखील करतात. प्रेक्षकांकडून त्यांना तेवढे प्रेम मिळते. कधी कधी तर वैयक्तिक आयुष्यात देखील ते प्रेक्षकांना मदत करून त्यांची मने जिंकून घेण्यात कोणतीच कसर सोडत नाही. या कलाकारांच्या यादीत सलमान खान, शाहरुख खान, सोनू सूद, पलक मुच्छल सारख्या अनेक कलाकारांचा समावेश होतो. हे नेहमीच अनाथ आणि गरीब जनतेला मदत करताना दिसतात. याच यादीत आता आणखी एक नाव सामील झाले आहे. ते म्हणजे ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवाल.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी पासून ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने जिने सगळ्यांची मन जिंकून घेतली ती म्हणजे काजल अग्रवाल. तिच्या चाहत्यांना तिचा अभिनय तर आवडतोच. पण नुकतेच तिने केलेल्या कामामुळे तिची सर्वत्र वाहवा सुरू आहे. काजलने हैद्राबादमधील एका मुलीची कॉलेजची फी भरली आहे. तिने शनिवारी सुमा नावाच्या एका मुलीला आर्थिक मदत केली आहे.

सुमा ही एक फार्मसी विद्यार्थीनी आहे. पण तिच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा तिने ट्विटरवरून काजलकडे मदत मागितली होती. तिने काजल टॅग करून तिचे अकाउंट डिटेल्स शेअर केल्या आणि मदत मागितली होती.

सुमाने काजलला टॅग करून लिहिले की, “काही दिवसांपूर्वी माझी नोकरी गेली आहे. आणि आता M. Farm ची फी भरण्यासाठी मी पैसे गोळा करत आहे. तुम्ही कृपया मला मदत करा.” काजलच्या प्रतिनिधीने तिची ही पोस्ट वाचली आणि लगेच काजलला सांगितले. त्यानंतर तिने लगेच तिच्या अकाउंटमधील एक लाख रुपये सुमाला पाठवले. तिची ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. सगळेजण तिचे खूपच कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नेटकरी तर नेटकरी, आता बिग बींनीही साधला ‘विरुष्का’वर निशाणा, जोक वाचून चाहत्यांमध्ये हास्याचा कल्लोळ

-लॉकडाऊनमुळे बॉलिवूडवर येऊ शकते मोठे संकट, कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

-बापरे! ‘हिरो नंबर १’ गोविंदा सापडला मोठ्या अडचणीत, पत्नीने दिली माहिती

हे देखील वाचा