Monday, June 24, 2024

‘इश्क’ सिनेमाची २४ वर्ष, काजोल आणि जुहीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा

आपली हिंदी सिनेसृष्टी सर्वात जास्त सिनेमे वर्षाला देणारी इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते. वर्षाला हजारापेक्षा जास्त सिनेमे बनवणाऱ्या या क्षेत्रात वर्षात एक तरी असा सिनेमा बनतो, जो बॉक्स ऑफिससोबत प्रेक्षकांच्या मनात आणि डोक्यात अक्षरशः छापला जातो. आजपर्यंतच्या बॉलिवूडच्या इतिहासात अनेक चित्रपटांनी लोकप्रियतेचा इतिहास रचला. असच एक सिनेमा ज्याने प्रेक्षकांना हसवले, रडवले, भावनिक केले, ऍक्शन दाखवली जवळपास सर्वच बाबी एका सिनेमात रसिकांना दाखवून त्यांची वाहवा मिळवली. तो सिनेमा आहे ‘इश्क’.

काजोल, अजय देवगण, जुही चावला आणि आमिर खान या चौघांच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळवले. आजही हा सिनेमा सर्वांना अगदी लक्ख आठवत असणार. आज या चित्रपटाने २४ वर्ष पूर्ण केले आहे. रोमॅंटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटाच्या २४ वर्षांच्या पूर्ती निमित्य अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काजोलने ‘अंखिया तू मिला न राजा आये हैं दिन बहार के’ या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. ९० च्या दशकातील जुना सिनेमा.” सोबतच तिने 24yearsofishq हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

याशिवाय अभिनेत्री जुहीने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले, “चित्रपटात आम्ही लोकं किती हसलो होतो, मी किती रडली होती आणि सर्वच किती भांडले होते. इश्क चित्रपटासोबत आमचा प्रवास कोणत्याही रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता. या चित्रपटाला तयार होण्यासाठी तीन वर्ष लागले होते. हा सिनेमा एक उत्तम ऍक्शन सिनेमा होता. देवाचे खूप धन्यवाद. इंदुजी यांचे आभार. माझे सहकलाकार असणाऱ्या काजोल, अजय आणि आमिर यांचे देखील खूप आभार.सोबतच उत्तम निर्माते असणाऱ्या गोवर्धन तनवाणी यांचेही आभार.” या सिनेमातील कलाकार, गाणी, कथा आणि चित्रपटातील सीन्स खूपच हिट झाले. आजही युट्युबवर जाऊन या सिनेमातील सीन प्रकर्षाने पाहिले जातात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा