Saturday, June 29, 2024

‘त्याने मला जीवे मारण्याची सुपारी… ‘; ‘या’ अभिनेत्याने केले अक्षय कुमारवर गंभीर आरोप

कमाल आर खान स्वत:ला एक उत्तम अभिनेता समजतो. मात्र, हा अभिनेता चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावर त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. कमाल आत्तापर्यंत बी-टाऊनच्या अनेक स्टार्ससोबत अडचणीत आला आहे. यासोबतच केआरकेने आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी तुरुंगाची हवाही खाल्ली आहे. पण तरीही तो त्याचे बोलणे सुद्धारत नाही. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कोणाला तरी काहीही बोलत असतो. नुकतेच त्याने एक ट्विट केले आहे.

केआरकेने केलेल हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केआरकेने आपल्या नव्या ट्विटद्वारे एक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. केआरकेच्या म्हणण्यानुसार, अभिनेता अक्षय कुमार त्याला जीवे मारण्यासाठी सुपारी देतो. अक्षयला तुरुंगातच त्याचा खून करायचा होता. पण तो बाहेर आला. मात्र, अक्षय कुमारने (Akshay Kumar) पुन्हा एकदा त्याच्या नावाची सुपारी दिली असून त्याला तुरुंगात किंवा पोलीस ठाण्यात मारण्याचा कट रचला असल्याचे केआरकेनेचे म्हणणे आहे.

केआरकेने (KRK) ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अक्षय कुमार वगळता बॉलिवूडमधील सर्व कलाकारांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यानेच मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती. मला अटक केले होती. तुरुंगातून बाहेर पडलो हे माझ भाग्ययच. तो मला पुन्हा पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात मारण्याची सुपारी देत ​​आहे. मला काही झाले तर त्या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार अक्षय कुमार असेल. माझ्या हत्येशी सलमान खान, शाहरुख खान आणि करण जोहर यांचा काडीमात्र संबंध नाही.”

केआरने पुढे लिहीले की, “मिस्टर कॅनेडियन अक्षयने हे लक्षात घ्यायला हव आहे. त्याने मला जीव मारले तरीही संपुर्ण जग त्याला कॅनेडियन कुमार म्हणणार आहे. ज्या दिवशी केंद्रीत सरकार बदलेल, तेव्ही अक्षय कुमार भारतातून पळून गेलेला असेल. नाहीतर तो पोलिस कोठडीत असेल.” तसेच, त्याने अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड 2’ हा फ्लाॅप ठरेल असेही म्हटले आहे. त्यामुळे केआरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (Kamal R Khan made serious allegations against Akshay Kumar)

अधिक वाचा-
‘बिग बॉस OTT 2’ मध्ये मिया खलिफाची एन्ट्री? सलमान खानसोबत घालणार धुमाकूळ
भोजपूरी इंडस्ट्रीवर राज्य करतात ‘या’ पाच अभिनेत्री; सौंदर्यापासून ते संपत्तीच्या बाबतीत आहेत सर्वांत प्रथम

हे देखील वाचा