बॉलिवूड अभिनेत्री कंगना रौणतचा लॉकअप हा शो खूपच चर्चेत आहे. (Alt Balaji) ऑल्ट बालाजी वरती चालु आसलेला लॉकअप (Lock Upp) या शो मध्ये संवादादरम्यान कलाकार आपल्या वैयक्तिक जीवनात घडलेल्या गोष्टी शेअर करत आहे. जेव्हा पूनम पांडे (Poonam Pandey) जेवनाच्या टेबल बसून तिच्यावर होण्याऱ्या शारीरिक छळाबद्दल सांगितले आहे. तिने सायशा आणि पायला सांगितले की, मारपीठ झाल्यानंतरही ती मेकअप करुन कार्यक्रमांना जात असे. सायशा म्हणाली की, अनेक अश्या अभिनेत्री आहेत ज्या घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. परंतु यावरती विशेष कोणी बोलत नाही. इतकेच नाही तर सायशाने यावेळी तिच्या नात्याबद्दल काही गोष्टीही सांगितल्या आहेत.
ती म्हणते की, “प्रेम झाले तरी असेच असते. मी स्वत: अभ्रद संबंधात होते. पण ते शारिरीक शोषण नव्हते तर मानसिक आत्याचार होते त्याने अशाप्रकारे दाखवून दिले की, त्याच्या समोर माझे कोणतेही स्थान नाही. तो माझ्या घराबाहेर उभा असायचा. बाहेर उभा राहून तो वाट बघायचा की,कोणीतरी मला भेटायला येईल आणि तो मला रंगेहात पकडेल. मला रंगेहात पकडेल्यानंतर ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने तो करत होता.”
ती पुढे म्हणते की, “मी या नात्यात कधीच आनंदी नव्हते. सायशा ही तिची फॅशन डिझायनर आहे. जिने मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधुचा गाउन डिझाइन केला होता. सुरुवातीच्या काळात त्याना सोशल ते स्वप्नील या नावाने आळखले जात होते पण नुकतेच त्यानी स्वप्नील शिंदे हे नाव बदलुन सायशा शिंदे केले आहे. ती आता टारन्सवुमन म्हणुन आळखली जात आहे. तिचं मुलगी होण्याचं सक्रमण चालू आहे. तिच असं म्हणणं आहे की, मुलगा म्हणून ती कधीच खूश नव्हती.”
लॉकअपमध्ये प्रवेश करण्याआधी तीची स्वामी चक्रपाणिशी ओळख करुन दिली होती. तेव्हा त्यानी तिच्यापासून दूर राहण्याचे ठरवले होते. ते म्हणला की, सायशा पुर्वी खुपच चांगली दिसत होती तिने मुलगी म्हणुन स्वत:ला बदलले पाहिजे नव्हते पण लॉकअपमध्ये हे दोघे खूपच चांगले मित्र बनले त्याच्या चाहत्यांना त्याची मैत्री आवडत आहे. सायशा सोबतच मुनावर आणि करणवीर बोहरालाही पसंती देत आहेत.
हेही वाचा