अश्लीलता पसरवल्याच्या आरोपावर पूनम पांडे म्हणाली, ‘लोक रात्री माझे व्हिडिओ पाहतात आणि सकाळी…’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत होस्ट केलेला आणि एकता कपूर निर्मित ‘लॉक अप: बदमाश जेल अत्याचारी खेल’ या बंदिवान रियॅलिटी शोमध्ये दुसऱ्या दिवसापासून वाद सुरू झाला आहे. या शोमध्ये सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पोस्ट करून लोकप्रियता मिळवणारी पूनम पांडे देखील आहे. या शोमध्ये पूनम तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत आहे. यापूर्वी पूनमने सांगितले होते की, तिच्या पतीने तिला हनिमूनला कशी मारहाण केली, ज्यामुळे तिला ब्रेन हॅमरेज झाला होता. आता पूनमने तिला ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

कंगनाच्या शोमध्ये पूनम (Poonam Pandey) अंजली अरोरा आणि तहसीन पूनावाला यांच्याशी बोलताना दिसली होती. ज्यामध्ये तिने तिच्या व्हिडिओंवर ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला होता. एवढेच नाही, तर तिला लवकरच देशाबाहेर अमेरिकेला पाठवले जाईल असेही पूनमने सांगितले. या संभाषणात तहसीन पूनमला सांगतो की, लोक आधी तुझे व्हिडिओ पाहतात आणि मग तुझ्याबद्दल वाईट बोलतात. त्यावर पूनम म्हणते की, “मी तुझ्याशी सहमत आहे, ६० मिलियन इंप्रेशन, २०० मिलियन दर महिन्याला येत नाहीत.”

पूनम पुढे म्हणते की, “हे तेच लोक आहेत जे रात्री माझे व्हिडिओ पाहतात आणि मग सकाळी उठून ट्रोल करतात. माझ्याविरोधात कमेंट करायला लागतात. मला जाणून घ्यायचे आहे की, शेवटी कोण निर्लज्ज आहे? मी असो, त्यांना रात्री व्हिडिओ पाहून सकाळीच लाज वाटते.”

आपला मुद्दा पुढे करून पूनम म्हणते की, “हे लोक दुसरे तिसरे कोणी नसून चार-पाच महिलांचा समूह आहे. जे रिकाम्या बसून इतर महिलांचे वाईट करतात. त्यांना नेहमी माझी काळजी असायची की, माझं लग्न होईल की नाही? मी कोणते कपडे घालू? मी कधी मुलाला जन्म देईन का? मी त्यांना सर्व सांगू इच्छिते की, ही माझी जबाबदारी आहे आणि मला ती हाताळू द्या.”

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान पूनमने सांगितले की, तिला या रियॅलिटी शोच्या माध्यमातून तिची खरी बाजू उघड करायची आहे. पूनम म्हणते की, “मला माहित आहे की, मी प्रसिद्ध झाले. कधी कधी सर्व चुकीच्या कारणांमुळे, पण त्यातून जाऊ शकत नाही. मी देखील एक माणूस आहे ज्याला फक्त वाद नाही तर भावना आहेत.”

काही काळापूर्वी तिने पती सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि गुन्हाही दाखल केला होता. आता ती सॅमपासून वेगळी झाली आहे. जेव्हा पूनमने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले तेव्हा तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. पूनम पांडे खऱ्या आयुष्यात कशी आहे हे लोकांना माहीत नाही, असे ती म्हणते. या शोमध्ये ती चाहत्यांना स्वतःबद्दल सांगणार आहे.

हेही वाचा –

 

Latest Post