सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’


बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आज पहिली पुण्यतिथी आहे. सुशांत या जगात नाहीये, या गोष्टीवर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. त्याच्या चाहत्यांच्या मनावर तर या गोष्टीचा खूप मोठ्या आघात झाला आहे. त्याचे कुटुंबीय तर या धक्क्यातून नीट सावरले देखील नाहीत. आज त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यातच अनेक कलाकार आणि चाहते सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून त्याची आठवण काढत आहे. अशातच सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीने देखील एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिचा आणि सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे.

रियाने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “एकही क्षण असा नाही गेला जेव्हा मला वाटलं की, तू या जगात नाहीस. लोक असं म्हणतात की, काळासोबत सगळं काही ठीक होतं. पण तूच माझ्यासाठी माझा काळ माझं सगळं काही होतास. मला माहित आहे तू मला वरून पाहत आहेस. चंद्राच्या दुर्बीणमधून तू मला पाहत आहेस आणि माझी रक्षा करत आहेस. मी प्रत्येक दिवशी तू मला घ्यायला येण्याची वाट पाहत असते. मी तुला प्रत्येक जागी शोधत असते.”

तिने पुढे लिहिले की, “ही गोष्ट मला रोज तोडते पण मला परत तुझी आठवण येते. मी जेव्हा तुझ्याबद्दल विचार करते तेव्हा भावनांचे तुफान माझ्या शरीरात धावायला लागते. हे सगळे लिहिताना मला खूपच वाईट वाटत आहे.” (rhea chakraborty share a emotional post about sushant singh rajput)

रियाने पुढे लिहिले की, “तुझ्या शिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. तू माझ्या आयुष्याचे महत्व तुझ्या सोबतच घेऊन गेला आहेस. माझ्या आयुष्यातील जी जागा खाली आहे ती आता भरू शकणार नाही. तुझ्याशिवाय आज मी एकटीच उभी आहे. माझी सनशाईन आज मी तुला वचन देते की, मी दररोज तुला मालपुवा देईल. या जगातील सगळी क्वांटम फिजिक्स पुस्तके वाचेल. फक्त तू परत ये. मला तुझी खुप आठवण येते माझ्या मित्रा.”

सुशांतच्या आयुष्यातील रिया ही महत्वाची व्यक्ती होती. ती सुशांत सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिची अनेक वेळा चौकशी झाली आहे. सुशांतचे वडील केके सिंग यांनी तिच्यावर सुशांत सिंगला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल आणि १५ कोटींची अफलातफल केल्याबद्दल केस दाखल केली होती.

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सगळे रियाला जबाबदार ठरवत होते. आजही यावर केस चालूच आहे. त्यानंतर रियाने सोशल मीडियावर पोस्ट करणे सोडून दिले होते. कारण सुशांत सिंगचे चाहते या पोस्टवर असभ्य कमेंट करत होते. त्याच्या निधनानंतर तिला ड्रग्ज प्रकरणात अटक देखील केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॉकडाऊननंतर ‘बिग बी’ प्रथमच निघाले शूटिंगवर; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन


Leave A Reply

Your email address will not be published.