अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा बॉलिवूड स्टार्सवर आपला राग व्यक्त केला आहे. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने सांगितले की, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) कधीही तिच्या चित्रपटांचे प्रमोशन करणार नाही. त्याचवेळी, अक्षय कुमार (AKshay Kumar) चित्रपटासाठी फोनवर तिचे अभिनंदन करेल, परंतु तिच्या चित्रपटाचा ट्रेलर कधीही ट्वीट करणार नाही.
कंगना रणौतचा ‘धाकड’ हा चित्रपट २० मे रोजी थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे. कंगना या चित्रपटात गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात ती ऍक्शन करताना दिसणार आहे. याच निमित्ताने तिने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे.
बॉलिवूडच्या कलाकारांमध्ये असलेल्या एकीवर आणि मैत्रिपूर्ण नात्यावर बोलताना कंगणाने जोरदार टीका केली आहे.
अजय देवगणच्या ‘बॉलिवूड बोनोमी’ विधानाबद्दल आणि बॉलिवूड स्टार्सचा ‘एकमेकांना सपोर्ट’ याबद्दल विचारले असता, कंगनाने उत्तर दिले, “अजय देवगण माझे चित्रपट सोडून इतर सर्व चित्रपटांचे प्रमोशन करेल. तो कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही.” यानंतर, कंगना अक्षय कुमारबद्दल बोलताना म्हणाली की, “अक्षय कुमारने मला शांतपणे फोन केला आणि सांगितले की मला तुझा चित्रपट थलायवी खूप आवडला, पण तो माझ्या चित्रपटाचा ट्रेलर कधीही ट्विट करणार नाही.
कंगना रणौतने अजय देवगणबद्दल पुढे सांगितले की, “तो एका स्त्रीकेंद्रित चित्रपटात भूमिका करतो आहे. पण माझ्या चित्रपटात तो असे करेल का? जर त्याने तसे केले तर मी खूप आभारी राहीन. अर्जुन रामपालने केल्याप्रमाणे तो माझ्या चित्रपटाचे समर्थन करू शकत नाही. त्यांना नको आहे हे अगदी स्पष्ट आहे. मला वाटते की सर्व कलाकारांनी मला पाठिंबा दिला पाहिजे कारण मी त्यांना सपोर्ट करते.”
मुलाखतीदरम्यान, जेव्हा कंगनाला कलाकारांच्या या वृत्तीबद्दल पुन्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “तुम्हाला त्यांना विचारण्याची गरज आहे, मला नाही. मी त्यांच्या वतीने उत्तर देऊ शकत नाही. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच केलेले ट्विट डिलीट केल्याचे उदाहरण देऊन कंगनाने पुढे म्हटले आहे की, “श्री बच्चन यांनी माझा ट्रेलर ट्विट केला आणि लगेच हटवला. तुम्ही मला विचाराल की त्याने असे का केले. मला माहित नाही. तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे.” असे म्हणत तिने थेट उत्तर दिले आहे.
हेही वाचा-