Friday, April 19, 2024

फुकाची ‘टीवटीव’ नडली! ट्विटरकडून कंगनाचं अकाउंट बंद; ‘या’ कारणामुळे झाली कारवाई

बॉलिवूडची ‘पंगा’ गर्ल म्हणून अभिनेत्री कंगना राणावतची ओळख आहे. कंगना ही सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असलेली अभिनेत्री आहे. ती नेहमीच चालू घडामोडींवर ट्विट करत तिची बाजू मांडत असते.

कंगना कसलाही विचार न करता तिला जे वाटते ते ती बिनधास्त सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलींगचा सामना देखील करावा लागतो. मात्र, ती ट्रोलर्सला देखील उत्तरं द्यायला तयार असते.

कंगना नेहमी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होते. मात्र, आज तिच्यावर तिच्या काही बेताल वक्तव्यांमुळे ट्विटरकडून काऊंटवर तात्पुरते स्थगित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

kangana ranaut

कंगनाने तिच्या ट्विटवर अकाऊंटवर काही स्वरूपाचे निर्बंध लादल्याचे तिने स्वतः सांगितले. सोबतच तिने ट्विटरचे सीईओ जॅक यांना टॅग करत एक सणसणीत ट्विट केले आहे. सोबतच ज्यांनी तिचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्याची मागणी केली होती, त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले आहे.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “लिबरल लोकं चाचा जॅकसमोर रडले आणि माझे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी प्रतिबंधित केले, ते मला धमक्या देखील देत आहेत. माझे अकाऊंट / माझी आभासी ओळख कधीही देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र माझे रेलोडेड देशभक्त व्हर्जन चित्रपटांद्वारे पुन्हा परतेल. तुमचे जगणे मी मुश्किल करून ठेवीन.”

https://twitter.com/KanganaTeam/status/1351763172349382659?s=20

यानंतर कंगनाने लगेच दुसरे ट्विट करत लिहिले की, एंटी नॅशनल लोकं #SuspendKanganaRanaut हे ट्रँड होत आहे. जेव्हा या लोकांनी रंगोलीला ट्विटरवर बॅन केले तेव्हा मी येऊन त्यांचे आयुष्य हराम केले. आता या लोकांनी माझे ट्विटर अकाऊंट बंद करत मला या आभासी जगातून बाहेर काढले आहे, आता मी या लोकांना खऱ्या आयुष्यात खऱ्या कंगनाचे रूप दाखवेल. सगळ्यांची आई बनून दाखवेल. #babbarsherni’

https://twitter.com/KanganaTeam/status/1351813095568637952?s=20

दरम्यान काल कंगनाने ‘तांडव’ या वेबसीरिजच्या चालू असणाऱ्या वादासंदर्भात सैफ अली खान आणि तांडवचे दिग्दर्शक अली जब्बास जफरवर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. ‘कारण भगवान श्रीकृष्णानेही शिशुपालच्या ९९ चुका माफ केल्या होत्या… आधी शांती, मग क्रांती… यांचे शिर धडावेगळे करण्याची वेळ आली आहे, जय श्रीकृष्ण,’ असे ट्विट कंगनाने केले होते.

तिच्या ट्विटवरून अनेकांनी तिला खडेबोल सुनावले. या ट्विटवरून वाद वाढताना पाहून कंगनाने हे ट्विट डिलीटही केले होते. मात्र, तोपर्यंत अनेकांनी तिचे हे ट्विट हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे असल्याची तक्रार करत ट्विटरला रिपोर्ट केला. त्याचाच परिणाम म्हणून आज कंगनाच्या ट्विटर अकाऊंटला निर्बंध लादण्यात आले आहे.

हे देखील वाचा