Tuesday, June 18, 2024

‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेमी लिव्हरने केली फराह खानची नक्कल, पाहून अभिषेक बच्चनही झाला लोटपोट

टेलिव्हिजनवरील कॉमेडी शो ‘द: कपिल शर्मा शो’ खूप चर्चेत असतो. अशातच या शोमध्ये अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा सिंग त्यांचा आगामी चित्रपट ‘बॉब बिस्वास’च्या प्रमोशनसाठी येणार आहेत. या खास एपिसोडमध्ये जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर फराह खानची नक्कल करताना दिसणार आहेत. सोनी टीव्हीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून या खास एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे.

याआधी आलेल्या एका प्रोमोमध्ये जेमीला फराह खान सांगून अभिषेकसोबत परफॉर्मन्स करताना दिसत आहे. यावर ती अभिषेकला म्हणते की, “हाय अभिषेक, खूप दिवसांपासून डान्स केला नाही.” यावर तो म्हणतो की, “हाय फराह खूप दिवसापासून नाही केला.” यावर जेमी म्हणते की, “हाय चित्रांगदा खूप दिवसापासून डान्स नाही केला. कपिल प्लीज कपिल डान्स करू नको.” यावर सगळेच हसतात. (Kapil sharma show, Johnny lever daughter jemie mimics Farah Khan, Abhishek Bachchan could not stop laughing)

कपिल तिला विचारतो की, “तो कोणता चित्रपट बनवणार आहे का?” यावर जेमी फराहच्या अंदाजात म्हणते की, “हो, चित्रपट करत आहे. मी नाही ती बनवत होती. ‘मैं हू ना २’ मी शाहरुख खानला फोन केला आणि शाहरुख म्हणाला मैं नहीं हू ना.” जेमीचे हे बोलणे ऐकून अभिषेक बच्चन खूप हसतो.

त्यानंतर कृष्णा अभिषेक, जॅकी श्रॉफ बनून आला आणि जेमीच्या पाठीवर मारून म्हणाला की, “बच्चा आहेस तू माझा.” यावर जेमी म्हणते की, “आता हे खूपच झालं.” यानंतर ती खोटा खोटा फोन लावते आणि म्हणते की, “जॉनी जॉनी येस पापा हे बघा मला त्यांचा बच्चा म्हणत आहेत.”

हा प्रोमो पाहून हा एपिसोड खूपच रंगतदार असणार आहे, असे वाटते आहे. हा एपिसोड बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. जेमीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकावर राखी सावंतचा पती फिदा; प्रपोज केल्यानंतर राखीची रिऍक्शन पाहण्यासारखी

-शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने यूटुबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद

हे देखील वाचा