Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

करण, आमिर की शाहरुख… अटकेसाठी जबाबदार कोण? केआरकेने स्वत: ट्विट करुन सांगितलं सत्य

अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान (Kamal Rashid Khan) याला नुकताच जामिन मंजूर झाला. वादग्रस्त ट्विट आणि विनयभंग प्रकरणात त्याला अटक झाली होती. दुबईहून मुंबईत परतताच विमानतळावर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर आणि करण जोहर(Karan Johar) निर्मित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी केआरकेला अटक झाल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी केआरकेसाठी न्यायाची मागणी केली. तर काहीजण करण जोहर आणि आमिर खानला मास्टरमाईंड म्हणत होते. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेनं अटकेमागच्या सत्यावरून पडदा उचलला आहे.

केआरकेनं नुकतंच ट्विट करत लिहिलं, ‘अनेकजण म्हणत आहेत की माझ्या अटकेच्या मागे करण जोहरचा हात होता. मात्र हे सत्य नाही. करण जोहर, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार या सर्वांचं माझ्या अटकेशी काहीच देणंघेणं नाही.’

केआरकेने कसे दहा दिवस तुरुंगात घालवले
तुरुंगातील 10 दिवस कसे काढले याविषयीसुद्धा त्याने एक ट्विट केलं होतं. ‘लॉकअपमध्ये असताना दहा दिवस मी फक्त पाणी पिऊन जगलोय. त्यामुळे माझं 10 किलो वजन कमी झालंय’, असं ट्विट केआरकेनं केलं. अवघ्या काही मिनिटांतच त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.

केआरके तुरुंगात का गेला?
2020 मध्ये केलेल्या ट्विटसाठी केआरकेला ताब्यात घेण्यात आले होते. त्या ट्विटमध्ये केआरकेने दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याशिवाय 2019मध्ये फिटनेस ट्रेनरचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे त्याला तुरुंगातही राहावे लागले होते. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हृदयद्रावक! सिनेजगतात क्रांती घडवणाऱ्या दिग्गज निर्मात्याचे निधन, चाहते दु:खाच्या सागरात

रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात
सासू आणि आईने घेतला पुढाकार, आलियाच्या ‘बेबी शॉवर’ची सुरू झाली जोरदार तयारी

हे देखील वाचा