‘…ही बट नॅचरल आहे!’ अमेय वाघच्या लेटेस्ट फोटोने वेधलं सोशल मीडियाचं लक्ष


संजय जाधव आणि दीपक राने यांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ चांगलीच गाजली. या मालिकेने तर नाव कमावलेच, सोबत यातील कलाकारांना देखील अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. यातलं कैवल्यचं म्हणजेच अमेय वाघचं पात्र विशेष भाव खाऊन गेलं. श्रीमंत बापाचा मुलगा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे बाहेर पडतो आणि अनोळखी लोकांसोबत राहू लागतो, हे यात पाहायला मिळालं. हेच अनोळखी लोकं पुढं एकमेकांना जीव लावणारे मित्र बनतात.

अमेय आता अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. दरदिवशी पोस्ट शेअर करून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे कुटुंबातील सदस्यांचे फोटोदेखील तो शेअर करतो. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये कैवल्य त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखला जायचा. रिअल लाईफमध्ये देखील अमेयचा सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा आहे. हे आपण त्याच्या पोस्टखालील कॅप्शनमध्ये सहज पाहू शकतो.

नुकताच अमेयने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला आहे, ज्यात तो बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. शिवाय त्याच्या चेहऱ्यावर एक बटही आलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत अमेय म्हणतोय की, “या फोटोसाठी मी केस विंचरले नाहीत. ही बट नॅचरल आहे!” चाहत्यांना हे मजेदार कॅप्शन खूपच पसंत पडलं आहे.

अमेयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने विविध माध्यमातून चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट शिवाय वेब सिरीजमध्ये देखील तो झळकला आहे. ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ या चित्रपटातील अमेयच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. अभिनेता अखेरच्या वेळेस ‘झोंबिवली’मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.