करीना लवकरच होणार आई, डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये झाली दाखल


बॉलिवूडची पु अर्थात करीना कपूर खान केव्हाही आई होऊ शकते. करीना पूर्ण नऊ महिन्यांची गरोदर आहे. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. काल रात्री करीना कपूरची आई बबिता आणि बहीण करिष्मा कपूर तिला भेटायला तिच्या घरी गेले होते.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत असून, यात करीना कपूरची आई बबिता आणि बहीण करिष्मा दिसत आहे. शिवाय सैफ आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम देखील करीनाला भेटायला पोहचला आहे.

करीनाला १५ फेब्रुवारीच्या आसपास डिलिव्हरीची तारीख दिली होती. त्यामुळे आता करीना लवकरच आई होऊ शकते अशी माहिती मिळत आहे.

करीना कपूरला आतापासूनच नव्या बाळासाठी अनेक भेटवस्तू मिळत आहेत. तिच्या घरी नेल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबतच तिने तिच्या इंस्टास्टोरीवर देखील गिफ्ट्सचे काही फोटो पोस्ट करत धन्यवाद म्हटले आहे.

करीना आणि सैफने मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये करीना दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे जाहीर केले होते. करीनाच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण खान आणि कपूर कुटुंब खूपच उत्साहित आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.