Friday, July 5, 2024

करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

नुकताच करीना कपूर खानने तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला. करीना तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबासह मालदीवमध्ये पोहचली आहे. सैफ, तैमूर, जेह आणि करीना सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यांचे या सुट्ट्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. करीनाचा वाढदिवस अतिशय शानदार पद्धतीने साजरा झाला ते तिने शेअर केलेल्या फोटोंवरून लक्षात येत आहे.

करिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये संध्याकाळची वेळ असून सैफ आणि तैमूर समुद्र किनारी रेतीवर चालताना दिसत आहे. तर त्यांच्या मागे करीना जेहला पकडून चालत आहे. या दोघांच्या मध्ये आगीने ‘हॅप्पी बर्थडे’ असे लिहिले आहे. हे नावच या फोटोचे मोठे आकर्षण आहे.

हा फोटो शेअर करताना करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “आगीला जळतच राहू द्या, वाढदिवसाच्या दिवशी स्वतः दिलेले वचन.” तिच्या या फोटोवर अभिनेत्री दीपिका पदुकोणने कमेंट करत लिहिले, ‘हॅप्पी बर्थडे तुला उत्तम आरोग्य आणि डोक्याला शांती लाभो.’ यासोबतच अनेक कलाकारांनी तिच्या या फोटोवर कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करिनाने २१ सप्टेंबरला तिचा आणि सैफचा एका रोमँटिक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर लाईक्स तर आले मात्र तिचा फोटोमधील लूक पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. मेकअपशिवाय असणारा तिचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ‘म्हातारी’, म्हणत ट्रोल केले आहे. याशिवाय करीना आणि सैफ त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून ‘जेह’वरून देखील खूप ट्रोल होत आहे. करीना बद्दल सांगायचे झाले तर करिनाने २०१२ साली सैफ अली खानसोबत लग्न केले. या दोघांना तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत. लवकरच करीन आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा