Saturday, April 27, 2024

करीना कपूरने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला तिचा आणि सैफचा अनसीन फोटो, म्हणाली…

बॉलिवूडची बेबो आणि सैफ या दोघांची जोडी कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. त्यांच्या चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहणे खूप आवडते. करीना आणि सैफने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी विवाह केला. शनिवारी (१६ ऑक्टोबर) दोघे लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. या दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने लग्न उरकले. कारण करीना आणि सैफ दोघांनाही मोठ्या गाजावाजामध्ये लग्न करायचे नव्हते. काही दिवसांपूर्वीच रणधीर कपूर यांनी करीना आणि सैफ यांच्या लग्नावरून एक खुलासा केला. त्यांनी या दोघांना मोठ्या जल्लोषात लग्न करण्याचे सुचवले होते. मात्र दोघांनीही नकार दिला.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करीनाने त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा त्यांचा खूप जुना फोटो आहे. हा फोटो कदाचित खूप लोकांनी कधी पाहिलेला नसेल. आता करीनाने हा फोटो शेअर केल्याने चाहत्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटाची आठवण झाली आहे. अनेक जण हा फोटो ‘कुर्बान’ या चित्रपटामधला असल्याचे बोलत आहेत.\

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीनाने सैफच्या खांद्यावर हात ठेवत त्याला मिठीत घेतले आहे. यावेळी तिने राखाडी रंगाचा ड्रेस घातलेला आहे, तर सैफ लाल रंगाच्या कुर्तीमध्ये दिसत आहे. यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत असून, फोटोमध्ये टेबलावर एक सूपची वाटी देखील दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वन्स अपॉन अ टाईम इन ग्रीस. सूपची वाटी आणि आम्ही दोघे. याच वेळी माझे आयुष्य बदलून गेले. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या जगातील सर्वात सुंदर मुलगा.”

या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये करिश्मा कपूरने लिहिले की, “माझी आवडती जोडी.” तर प्रियांका चोप्राने देखील दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. करीना आणि सैफ दोघेही त्यांच्या विवाहित आयुष्यात खूप सुखी असून, या दोघांना दोन मुले देखील आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर तर छोट्याचे नाव जहांगीर असे आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा