×

करीना कपूरचे वाढलेले पोट पाहून चक्रावले युजर्स, व्हिडिओ समोर येताच दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री त्यांच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे जितक्या चर्चेत असतात, तितक्याच त्या अनेकदा ट्रोल सुद्धा होत असतात. आताही अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) तिच्या फिटनेसमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

करीना कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याने तिने स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर ती जास्त चित्रपटात झळकली नसली, तरी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रिय असते. आता नुकताच करीनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामधील तिचे वाढलेले पोट पाहून नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे.

हा व्हायरल व्हिडिओ १६ फेब्रुवारीला करीना एका हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडतानाचा आहे. हॉटेलमधून बाहेर पडताना करीना माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हायरल व्हिडिओ फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत करीना कपूरला ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने सल्ला दिला आहे की, “बेबोला पुन्हा एकदा फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे.” तर आणखी एकाने करीनाची खिल्ली उडवत लिहिले की, “मी थक्क झालोय. तैमुर झाला तेव्हा तर ठीक होती आता हे तिच्यासोबत काय झाले.” तर काही नेटकऱ्यांनी, “करीना आता चित्रपट जगतातून बाहेर पडण्याची तयारी करत आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याआधीही काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता. आणि यामध्ये कॅप्शन दिले की, “मी आजपासून व्यायाम करणार होते मात्र या पदार्थामुळे राहून गेले.” आता आगामी काळात करीना ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटात आमीर खानसोबत काम करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ११ ऑगस्ट २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा –

Latest Post