कॅटरिना आणि विक्की कौशल यांचे लग्न कन्फर्म असल्याच्या ‘हा’ पुरावा झाला सोशल मीडियावर व्हायरल


कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल लवकरच लग्न करत आहे अशा बातम्या आपण मागील बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहोत. याच महिन्यात ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राजस्थान येथील सवाई माधोपुर येथील किल्ल्यात होणार आहे. मात्र या लग्नाबद्दल अजूनपर्यंत कोणाकडूनही अधिकृत माहिती आली नव्हती. मात्र आता कॅटरिना आणि विक्की लग्न करत असल्याचा एक मोठा पुरावा समोर आला आहे.

आता कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांचे लग्न म्हणजे व्हीव्हीआयपी लग्न ठरणार आहे. त्यामुळे या लग्नाला मोठी सुरक्षा देखील दिली जाणार आहे. त्यामुळे या लग्नासाठी राजस्थान सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर या लग्नाच्या तयारीला सुरूवात केली असून, खासकरून ही तयारी प्रशासनिक पातळीवर जास्त होत आहे. कॅटरिना आणि विक्कीचे लग्न समोर ठेऊन माधोपुर जिल्ह्याच्या डीएम यांनी एक बैठक देखील घेतली.

या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या हस्ती हजेरी लावणार असून, त्यांची फॅन फॉलोविंग पाहून योग्य ती सुरक्षा आणि खबरदारी घेण्यासाठी डीएम यांनी बैठक घेतली. मीडियामधील रिपोर्ट्सनुसार पीएमओ पातळीवरील ऑफिसर देखील लग्नाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सर्वच लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असून त्यानुसार आता सर्व कामे केली जात आहेत. एकचे सर्व नियोजन करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी होत असलेल्या बैठकीची एक चिट्ठी सध्या मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या चिट्ठीवर स्पष्ट लिहिले दिसत आहे की, अभिनेता विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या नियोजनासाठी ही बैठक घेतली जात आहे. हा या लग्नाचाच मोठा पुरावा समजला जात आहे.

कॅटरिना आणि विक्की ३ डिसेंबर रोजी आधी कोर्ट मॅरेज करणार असून, त्यानंतर राजस्थानमध्ये विधिवत लग्न करतील. या दोघांचे कुटुंब ६ डिसेंबर रोजी लग्नस्थळावर पोहचणार आहे. एक रिपोर्टनुसार कॅटरिना आणि विक्की यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो एका मोठ्या इंटरनॅशनल मासिकाला कोट्यवधी रुपयांना विकले असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय याच मासिकाच्या भारतीय आवृत्तींसोबत देखील त्यांचे बोलणे चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया


Latest Post

error: Content is protected !!