Sunday, June 23, 2024

‘प्राजु’च्या सुंदरतेने पाडली नेटकऱ्यांना भुरळ! मनमोहक सौंदर्याचं दर्शन घडवणारा व्हिडिओ आला समोर

अभिनेत्री केतकी माटेगावकरने तिच्या गोंडस स्मित आणि उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना चकित करून सोडले. ‘टाईमपास’ मधली तिची ‘प्राजक्ता’ची भूमिका प्रचंड गाजली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ती ‘प्राजू’ म्हणूनच ओळखली जायची. चित्रपटातील साधी प्राजू खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे. हे आपण तिच्या फोटो आणि व्हिडिओद्वारे सहज पाहू शकतो. अभिनेत्रीच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली की तुमच्याही लक्षात येईल की, ती किती ग्लॅमरस आहे.

नुकताच केतकीने शेअर केलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये केतकीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. सोबतच केतकी यात तिच्या अदा दाखवताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बन्नो’ गाणे वाजत आहे.

या व्हिडिओखाली तिने पिवळ्या रंगाचे हार्ट बनवले आहेत. केतकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते यावर हार्ट आणि फायर ईमोजी पोस्ट करून तिचं कौतुक करत आहेत. तसेच यावर आतापर्यंत ३६ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

केतकीने २०१२ साली ‘शाळा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने बऱ्याच मराठी चित्रपटात भूमिका साकारून आपले नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा