बहुप्रतिक्षित ‘केजीएफ २’ चित्रपटासाठी करावी लागणार प्रतिक्षा, ९ सप्टेंबर तारीख आहे अनिश्चित


कोरोनामुळे बऱ्याच प्रमाणात जनजीवन ठप्प झाले आहे. चित्रपटसृष्टीवर देखील कोरोनाचा खूप प्रभाव झाला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने बरेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत, तर अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. यातच चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘केजीएफ 2.’ या चित्रपटाचा पहिला भाग खूपच गाजला होता. त्यातच प्रेक्षक आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. (KGF 2 release date postpone, Taran Adarsh’s twitter post)

चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे अशी माहिती दिली होती. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परंतु अजूनही हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची नेमकी तारीख समोर आली नाही.

फिल्म क्रिटीक आणि ट्रेड ऍनालिटिक्स तरण आदर्श यांनी ट्वीट केले आहे की, “केजीएफ 2 हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट प्रदर्शित करताना सारख्या तारखा बदलताना दिसत आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण अजूनही निर्मात्यांकडून कोणतीही निश्चित माहिती आली नाही.”

याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 16 जुलै ही सांगितली होती. त्यानंतर ती बदलून पुन्हा 9 सप्टेंबर सांगितली. पण अजूनही ही तारीख निश्चित नसल्याची माहिती समोर आली आहे.

‘केजीएफ 2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटून गेले आहेत. प्रेक्षक कन्नड स्टार यशच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दर्शवला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.