Friday, April 19, 2024

सलमान- आमिर नाही, तर बॉलिवूडमधल्या फक्त ‘या’ अभिनेत्यासोबत काम करायचं रॉकीभाईचं स्वप्नं

बॉलिवूड कलाकारांचे चाहते जगभरात पसरले आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते आतुर असतात. विशेष म्हणजे, इतर इंडस्ट्रीतील कलाकारही बॉलिवूड कलाकारांचे चाहते आहेत. त्यातील काहींना त्यांच्यासोबत कामही करायचे असते. यामध्ये ‘केजीएफ’ फेम सुपरस्टार यश याचाही समावेश आहे. यशलाही बॉलिवूडचा एक अभिनेता खूप जास्त आवडतो, पण तो अभिनेता आहे तरी कोण? चला जाणून घेऊया…

नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत करायचंय काम
‘केजीएफ’ (KGF) स्टार यश (Yash) याने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याची प्रशंसा केली आहे. तसेच, त्याने हे मान्य केले आहे की, त्याला नवाजुद्दीकीसोबत काम करायला आवडेल. नुकत्याच एका मुलाखतीत यशला विचारण्यात आले की, त्याला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? यावर यशने सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांचे नाव घेतलेच नाही. तो म्हणाला की, “नवाजुद्दीन सिद्दीकी.” मुलाखतीत यश म्हणाला की, “मला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करायचे आहे. मला वाटते की, तो एक अद्भुत अभिनेता आहे.”

नवाजुद्दीनने अनेक हिट सिनेमात केलंय काम
नवाजुद्दीन याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने अनेक हिट सिनेमात काम केले आहे. त्याच्या सुपरहिट सिनेमांमध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर १ आणि २’, ‘रमण राघव २.०’, ‘मॉम’, ‘मंटो’, ‘सीरियस मेन’ यांचा समावेश आहे. त्याने ‘मॅकमाफिया’ आणि ‘सॅक्रेड गेम्स’ यांसारख्या वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

‘या’ सिनेमातून स्टार बनला यश
यशबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. तो कन्नड सिनेअभिनेता आहे. त्याने कन्नड सिनेसृष्टीतील मुख्य अभिनेता म्हणून ‘गुगली’, ‘राजा हुली’, ‘गजाकेसरी’, ‘मिस्टर एँड मिसेस रामचारी’, ‘मास्टरपीस’, आणि ‘संथू स्ट्रेट फॉरवर्ड’ यांसारख्या सिनेमात काम करून स्वत:ला सिद्ध केले आहे.

तब्बल ११००हून अधिक कोटींची कमाई
यश शेवटच्या ‘केजीएफ २’ या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा यावर्षी १४ एप्रिल, २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने भारतात ९९२ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरात या सिनेमाने ११९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अशात जर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि यश यांनी एकत्र सिनेमात काम केले, तर ही चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बापरे! क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यालाच घातला लाखोंचा गंडा, पाहा काय आहे प्रकरण
‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला
‘ओव्हर ऍक्टिंगच दुकान’, पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ पाहून पूनम पांडे झाली ट्रोल

हे देखील वाचा