साउथ इंडस्ट्रीमधील केजीएफ स्टारर यश त्याच्या दमदार अभिनय आणि लूकमुळे ओळखला जातो. त्याने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. केजीएफ चित्रपटानंतर अभिनेत्याने यशाचं शिखर गाठलं असून त्याला सर्वत्र ‘रॉकी भाई‘ या नावाने जगभरात ओळखू लागले. कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वाधि मानधन घेणाऱ्या अभिनेतांपैकी रॉकीचे नाव घेतलं जातं. KGF Chapter 2 साठी त्याने तब्बल 30 कोटीचा चेक मिळाला. मध्यमवर्गी कुटुंबातून आलेला मुलगा आज ब्रॅंड एंडोर्समेंटसाठी तब्बल 60 लाख रुपये मोजतो. त्याशिवाय अभिनेत्याची एकूण संपत्ती 57 कोटी रुपये आहे. अभिनेता आपला 37 वा वाढदिस साजरा करत आहे. या खास दिवशी अभिनेत्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
‘रॉकी भाई’ म्हणून ओळखला जाणारा KGF स्टारर यश (Yash) कर्नाटकामधील एका छोट्याश्या गावात वाढला. माध्यमातील वृत्तनुसार यशचे वडील सरकारी बस ड्रायव्हर होते. मुलगा मोठा अभिनेता झाला असूनही त्यांनी अनेक दिवस बस ड्रायव्हरचेच काम केले. यशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे यशने 12 नंतर ठरवलं की त्याला अभिनयातच करिअर करायचं आहे त्यामुळे त्याने शिक्षणही अर्धवट सोडले. मात्र, यशच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते. यशच्या या निर्णयाने त्याचं आयुष्य पालटलं.
अभिनयात करिअर करण्यासाठी यशने घर सोडून बंगळुरुमध्ये धाव घेतली. हातामध्ये केवळ 300 रुपये घेऊन तो कुटुंबापासून लांब आला. बंगळुरुच्या थिएटर ग्रुपचा भाग होण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अनेक दिवसांच्या धावपळीनंतर यशला बॅकग्राउंड कालाकाराची जागा मिळाली आणि यानंतर यशने आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही. हळू हळू तो पुढे जात राहीला आणि यांनतर त्याने साय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. यशने टीव्ही मालिकांसाठीही ऑडिशन दिलं असून अनेक मालिकांमध्येही कामही केले होते. त्यामुळे त्याचा पहिला चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला. ‘मोग्नी मनुस’ या चित्रपटामध्ये त्याने साहाय्यक भूमिका केली असून त्याला त्याच्या भुमिकांसाठी पुरस्कारही मिळाला होता.
View this post on Instagram
यश जेवढा अभिनयासाठी ओळखला जातो तेवढाच त्याच्या वैयक्तीक आयुष्यासाठी ओळखला जातो. त्याची आणि पत्नी राधिका पंडीत (Radhika Pandit) हिच्यासोबत लव्हस्टोरी देखिल चित्रपटांच्या कथांपेक्षा कमी नाही. 2004 साली नंदागोकुला या टीव्ही शोच्या सेटवर हे दोघे एमेकांना भेटले होते. हळुहळु त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यशने व्हॅलनटाईनला राधिकाला प्रपोज केले होते मात्र, राधिकाने त्याच्या प्रपोजरचं तब्बल 6 महिन्यांनी उत्तर दिलं होतं. शेवटी यश आणि राधिकाने (दि, 9 डिसेंबर 2016) रोजी बंगळुरुमध्ये थाटामाटात लग्न सोहळा उरकला. आता अभिनेत्याला यतार्थ नावाचा मुलगा आणि मुलगी आयरा आहेत.
View this post on Instagram
यशला खरी ओळख 2008 साली कन्नड चित्रपटामध्ये सक्रिय झाल्यानंतर मिळाली. 2018 साली KGF प्रदर्शित झाल्यानंतर यशचे जगभरात कौतुक झाले असून तो रातोरात सुपस्टार बनला. KGF चित्रपटाने जगभरात 250 केटीहून अधिक कामाइ केली. यानंतर यश KGF Chapter 2 मध्ये आला. या चित्रपटानंतर यशची क्रेज चांगलीच वाढली असून त्याला ‘सलाम रॉकी भाई’ या नावानेच उल्लेख करु लागले. माध्यामातील वृत्तानुसार 100 कोटी रुपयाच्या बजेटमधझ्ये बनवलेल्या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी पेक्षा अधिक कमाइ केली.
KGF 1च्या यशानंतर 2021 साली अभिनेत्याने नवीन डुप्लेक्स खरेदी केले ज्याची किंमत 8 ते 8.5 कोटी रुपये आहे. हे डुप्लेक्स घर बंगळुरुच्या मनोरजवळ प्रेस्टिज अपार्टमेंटमध्ये आहे. त्याशिवाय यशला कार केलक्शनचाही छंद आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर आहे ज्याची किंनमत 60 ते 80 लाख आहे असून 2 मर्सडिजही आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर का दिली आईने फरहान अख्तरला घराबाहेर काढण्याची धमकी? वाचा मनोरंजक किस्सा
‘घोडे पे सवार’ गाण्यावर थिरकताच अभिनेत्री ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अगं किती मोठे ओठ’