राड्यावर राडा! खेसारीलाल यादवने पुन्हा युट्यूबवर केला धुमाकूळ, नव्या गाण्याला मिळताय जबरदस्त हिट्स


होळीच्या सणाला जवळपास एक महिना बाकी आहे आणि यादरम्यान एकापेक्षा एक हिट भोजपुरी गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या दिवसांत खेसारीलाल यादवचं नवीन गाणं वारंवार पाहिलं जातंय. या नव्या गाण्याचे बोल आहेत ‘पिचकारी बाबू’. या भोजपुरी होळीगीताला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत सुमारे 5 दशलक्ष व्हिव्ज मिळाले आहेत.

हे गाणे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीचा अभिनेता आणि गायक खेसारीलाल यादव याने गायले आहे. तसेच, गाणे प्यारे लाल यादव कवि जी, आझाद सिंग आणि श्याम देहाती यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर गाण्याला संगीत रोशन सिंग यांनी दिले आहे.

वेब म्यूजिक यू-ट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या या गाण्याला भोजपुरी प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली आहे. तसेच, खेसारीलाल यादव यांनी गेल्या दोन महिन्यांत अनेक हिट गाणी दिली आहेत. यात ‘अपनी तो जैसे तैसे’, ‘दुई रूपया’ आणि ‘धोकेबाज हो गया’ यासह अनेक भोजपुरी गाण्यांचा समावेश आहे.

खेसारीलाल यादव यांना भोजपुरी इंडस्ट्रीचे हिट मशीन मानले जाते. कोट्यावधी फॅनफॉलोइंगमुळे त्यांचे चित्रपट आणि गाणी रिलीज होताच व्हायरल व्हायला लागतात.


Leave A Reply

Your email address will not be published.