Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘मोठ्या मोठ्या बाता मारायचा पण तु सुद्धा…’ ब्रेकअपच्या चर्चेनंतर कियारा अडवाणीची पोस्ट व्हायरल

‘मोठ्या मोठ्या बाता मारायचा पण तु सुद्धा…’ ब्रेकअपच्या चर्चेनंतर कियारा अडवाणीची पोस्ट व्हायरल

बॉलिवूड कलाकारांच्या प्रेमप्रकरणाच्या तसेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत येत असतात.  बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या प्रेमप्रकरणाचीही अशीच चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेकदा पार्टीत, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र फिरताना दिसल्याने त्यांच्या प्रेमप्रकरणाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. परंतु या दोघांनीही अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टिकरण दिले नाही. मात्र सध्या कियाराच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा उल्लेख केला आहे. 

बॉलीवूडमध्ये कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे प्रेम लपवता येत नाही. असेच एक हॉट कपल म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. दोघांनी कधीच आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले नाही, पण बी-टाऊनमध्ये त्यांच्या प्रेमाच्या चर्चा आहेत. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. तर आता कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर अशी एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यानंतर तिच्या चाहत्यांना असे वाटू लागले आहे की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे.

कियाराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सिद्धार्थ मल्होत्राला टॅग करत एक नोट लिहिली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले की, “सिद्धार्थ मल्होत्रा, खुप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता  पण तू ‘आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माइंड’ प्रकारचा निघाला आहेस.” कियाराच्या या व्हायरल पोस्टने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. परंतु तिच्या या पोस्टमागची खरी कहाणी काही वेगळीच आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी कियारा आणि सिद्धार्थ स्टारर शेरशाह OTT वर रिलीज झाला होता. कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले असून कथा संदीप श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. सिद्धार्थने बत्रा आणि त्याचा जुळा भाऊ विशाल यांची भूमिका केली आहे तर कियाराने त्याच्या मैत्रीण डिंपल चीमाची भूमिका केली आहे.

एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात, कियाराने तिच्या सोशल मीडिया चित्रपटातील एक डायलॉग शेअर केला आहे ज्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. 12 ऑगस्ट रोजी शेरशाहने रिलीजचे एक वर्ष पूर्ण केले आणि ते खास बनवण्यासाठी, सिद्धार्थने त्याच्या इन्स्टा वर एक व्हिडिओ शेअर केला, आहे ज्यामध्ये त्याने  “एक चित्रपट, एक वर्ष, एक कथा ज्याने आम्हा सर्वांना प्रेरणा दिली! हीतुमचे प्रेम, समर्थन आणि कौतुक कारण चित्रपटाने बरेच काही सांगितले आहे असे म्हणत शेरशहा चित्रपटाबद्दलची पोस्ट केली होती.

हेही वाचा – ‘बदनाम व्हायला मी मुन्नी आहे का?’ उर्वशी रौतेला रिषभ पंतचा सोशल मीडियावर रंगला वाद

‘काय मौसम- काय झाडी, तरी पण तुमचा भाऊ सिंगल’, प्रशांत नाकतीच्या नवीन गाण्याला तुफान प्रतिसाद

धर्मेंद्र – मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा पतीला लागला होता सुगावा, थेट तोंडाला काळे फासून घेतला बदला

हे देखील वाचा