हिंदी चित्रपट जगतात रोज नवनवीन कलाकारांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होताना पाहायला मिळत असते. आताही अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांंना डेट करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.याबद्दल दोघांनीही अधिकृत माहिती दिली नसली तरी दोघे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. आता पुन्हा एकदा दोघांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून या चर्चा जोर धरू लागल्या आहेत .काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियारा यांच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. दोघांची सुंदर केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच दोघांच्यात अफेअर सुरू असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. आता दोघांचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघे प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ नुकताच झालेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राला ‘शेरशाह’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कार वितरण समारंभावेळी सिद्धार्थ मल्होत्रा रेट कार्पेटवर उभा राहून कॅमेऱ्यासमोर पोज देत होता. त्याचवेळी कियारा त्या ठिकाणी आली.सिद्धार्थला पाहून कियारा आनंदून गेल्याचे यामध्ये दिसत आहे. पुढे कियाराने सिद्धार्थला मिठी मारत त्याचे अभिनंदनही केले. दोघांच्या या भेटीचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये घातलेल्या कियाराच्या पिवळ्या रंगाच्या साडीने सगळ्यांना मोहित केले आहे. आता लवकर दोघांनी आपल्या प्रेमप्रकरणाची अधिकृत घोषणा करावी अशीच इच्छा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.सध्यातरी फक्त त्यांच्या या सुंदर व्हिडिओचीच चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.