×

चित्रपटसृष्टी सोडून लांब गेली अक्षय कुमारची ‘ही’ अभिनेत्री, सॉफ्टवेअर इंजिनियरसोबत करतीये सुखाचा संसार

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत ज्यांनी ९० च्या दशकात धुमाकूळ घातला. परंतु मधेच त्या इंडस्ट्रीपासून दूर झाल्या. परंतु आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण आज त्या अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे आश्विन भावे. तुम्हाला हे नाव नक्कीच ओळखीचे वाटत असेल. त्यांनी ९० च्या दशकात एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. पण आज ही अभिनेत्री कुठे आहे आणि काय करतेय हे आपण जाणून घेऊया.

आश्विनी भावे ९० च्या दशकातील नावाजलेली अभिनेत्री होती. तिने जवळपास २० पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. ‘हिना’, ‘बंधन’ आणि ‘सैनिक’ हे तिचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. यासोबत ‘परंपरा’, ‘जज मुजरिम’, ‘युग पुरुष’, ‘अशांत’ आणि ‘इक्का राजा राणी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने १९९१ मध्ये ‘हिना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले.

आश्विनी भावेने अगदी कमी चित्रपटात काम केले आहे. आश्विनीने अक्षय कुमारच्या ‘सैनिक’ चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ती चर्चेत आली. त्यानंतर तिने ‘जख्मी दिल’ या चित्रपटात काम केले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

तिने १९९८ मध्ये सलमान खानसोबत ‘बंधन’ चित्रपटात काम केले आणि त्यानंतर ती अमेरिकेला गेली. अमेरिकेत तिने फिल्म मेकिंगचा क्लास देखील केला. त्यावेळी तिचे लग्न देखील झाले. लग्नाच्या १० वर्षानंतर म्हणजेच २०१७ मध्ये ती भारतात परत आली. तिने ‘ध्यानीमनी’ या चित्रपटातून कमबॅक केले. परंतु तिने काही खास कमाल केली नाही.

आश्विनी आता बॉलिवूडपासून दूर अमेरिकेत राहते. ती आता दोन मुलांची आई आहे. तिने २००७ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर दिकरसोबत लग्न केले.

हेही वाचा :

Latest Post