कियाराने सिद्धार्थसोबतचा खास व्हिडिओ केला शेअर, दोघांच्या केमिस्ट्रीने जिंकलं चाहत्यांचं मन

‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी होय. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या ह्रदयात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच बाॅलिवूडमधील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणार अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा होय. कियारा आणि सिद्धार्थची जोडी सध्या धुमाकूळ घालत आहे. अशातच कियारा आणि सिद्धार्थ एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत.

कधी चित्रपटच्या बातम्या, तर कधी त्यांच्या नात्यातील अफवांमुळे दोघेही काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्याचबरोबर १२ ऑगस्ट रोजी या दोघांचा ‘शेरशाह’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

या व्हिडिओमधील दोघांच्या स्टाईलने चाहत्यांना वेडं करुन सोडलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३.१ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये कियाराने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे आणि पिवळा दुपट्टा घेतला आहे. त्यामुळे तिचा लूक अजूनच खुलला आहे. त्याचवेळी सिद्धार्थने ब्राऊन जॅकेट आणि ब्लॅक पँट शर्ट परिधान केले आहे. दोघांच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दोघेही लवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहेत.

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सिद्धार्थ मल्होत्रा ‘थैंक गॉड’ आणि ‘मिशन मजनू’ मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर कियारा आडवाणीबद्दल बोलायचे झाले, तर ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कमरिया गर्ल’नंतर आता ‘बेबो’ बनली आकांक्षा दुबे; करीनाची नक्कल करत दाखवल्या हॉट अदा

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

Latest Post