किंग खान म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेत शाहरुख खान सध्या खूपच चर्चेत आला आहे. त्यचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पठाण‘ बॉयकॉट होत असल्यामुळे अभिनेत्याचे नवी ट्वीटरवरील ट्रेंड दाखवत आहे. मात्र, बॉयकॉटशिवाय शाहरुखच्या भलत्याच चर्चांना देखिल उधान आले आहे. नुकतंच शाहरुख आणि अभिनेत्री राणी मुखर्जी हे दोघेही कोलकत्तामध्ये एकत्र पाहायला मिळाले. त्याचे फोटो देखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नुकतंच अभिनय क्षेत्रामध्ये ‘कोलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल‘ 2022 गुरुवार (दि, 15 डिसेंबर) रोजी पार पडला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) शाहरुख खान (Shaharukh Khan), शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) रणी मुखर्जी (Rani Mukharji) सारख्या अनेक कलाकारांनी या फिल्म फेस्टिवलमध्ये हजे3री लावली होती. यावेळेस राणी काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर फेस्टीवलचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
शाहरुख देखिल काळ्या रंगाच्या सूट बूटमध्ये पाहायला मिळाला. त्याने काळ्या रंगाच्या सुटसोबत काळी टाय घातली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये एका फोटोने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. एका फोटोमध्ये राणी शाहरुखच्या हातांना किस करताना दिसून आली. त्याशिवया दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने बघताना दिसून आले. राणी आणि शाहरुखच्या जोडीलाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. पुन्हा ही जोडी रोमांटिक अंदाजात पाहायला मिळाली त्यामुळेल प्रेक्षक या फोटोंवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
व्हायरल झलेल्या फोटोवर एका युजरने लिहिले की, “अरे व्हा टीना आणि राहुल”, दुसऱ्याने लिहिले की, “या नात्याला रिप्लेस करु शकत नाही”, तर एका अन्यने लिहले की, “बेस्ट जोडी”, सांगितले आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर शाहरुख खान आणि बीग बी देखिल एकत्र पाहायला मिळाले. एका फोटोमध्ये, तर एका फोटोमध्ये अनेक कलाकार पाहायला मिळाले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
Laxmikant Berde। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा खास लेख ‘आठवणीतील लक्ष्या’
निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट