Thursday, April 25, 2024

हॉलिवूडची ‘ही’ लोकप्रिय जोडी लवकरच घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी किम कार्दशियन नेहमीच तिच्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजमुळे चर्चेत असते. किमला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करत असतात. यावेळेस किम जरा वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेचे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल म्हणून किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट ओळखले जातात. मात्र लवकरच हे कपल घटस्फोट घेण्याच्या बातम्यांनी सध्या जोर घेतला आहे.

किम आणि कान्ये यांच्यात सध्या काहीच आलबेल नसून ते मागील काही महिन्यांपासून वेगळे राहत. काही दिवसांपासून तर किम त्यांची वेडिंग रिंग देखील घालत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. किम कार्दशियन सध्या आपल्या चार मुलांसह लॉस अँजेलसमध्ये राहत असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. तर पती आणि रॅपर कान्ये वेस्ट हा त्याच्या फार्महाऊसवर राहतो. किम-कान्येच्या लग्नाला सहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. २०१४ मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले होते. या दोघांना नॉर्थ, सेंट. शिकागो आणि साम ही चार मुलं आहेत.

किम कार्दशियनच्या फोटो आणि व्हिडीओंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असते. किमला आणि कान्येला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. किमने पोस्ट शेअर करताच त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतो.

जर किमने हा घटस्फोट घेतला तर तिचा हा तिसरा घटस्फोट असणार आहे. याआधी  किमने हॉलीवुडचे अभिनेता डेमॉन थोमास आणि क्रिल हम्फ्रीज यांच्यासोबत तिने घटस्फोट घेतला आहे. किम एक मॉडेल, बिजनेसवुमन, प्रोड्यूसर आणि अभिनेत्री असून कान्ये वेस्ट हा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध रॅपर आहे. शिवाय कान्ये हिप हॉप संगीतासाठी सर्वात जास्त ओळखला जातो.

किम-कान्ये यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. शिवाय किमने मागील अनेक दिवसांपासून तिचा कान्येसोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नसल्याने त्यांच्या चाहत्यांना थोडी शंका आलीच होती.

हे देखील वाचा