Friday, December 8, 2023

शाहरुखने ‘Jawan’च्या रिलीजपूर्वी घेतले वैष्णो देवीचे दर्शन, कडक सुरक्षा घेऱ्यात दिसला ‘किंग’ खान

Shahrukh Khan Vaishno Devi । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे भलताच चर्चेत आहे. कधी तो चाहत्याला दिलेल्या रिप्लायमुळे, तर कधी त्याच्या आगामी ‘जवान‘ सिनेमामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच शाहरुख त्याच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओत शाहरुख खान वैष्णो देवी मंदिरात नतमस्तक होण्यासाठी जाताना दिसत आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘जवान’ (Jawan) सिनेमा पुढील महिन्यात 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या रिलीजपूर्वी दुसरा ट्रेलर 31 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी शाहरुख खान वैष्णो देवी (Shahrukh Khan Vaishno Devi) दर्शनासाठी गेला आहे. यादरम्यानचा व्हिडिओ चाहते शेअर करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शाहरुख कडक सुरक्षा घेऱ्यात दिसत आहे. त्याने आपला चेहरा झाकलेला दिसत आहे. जेणेकरून चाहत्यांना त्याला ओळखता येणार नाही. यादरम्यान शाहरुख पांढऱ्या रंगाच्या टी शर्ट आणि निळ्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तसेच, त्याने डेनिम परिधान केली आहे. शाहरुखने जॅकेटने आपले डोके झाकले आहे. तसेच, चेहऱ्यावर मास्क लावला आहे.

व्हिडिओ व्हायरल
शाहरुखचे चाहते सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ शेअर करत आहेत. शाहरुखच्या एका फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. एकाने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “जवानच्या रिलीजपूर्वी शाहरुख खान मां वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेला. एकच हृदय आहे खान साहेब, किती वेळा जिंकाल.”

‘जवान’ सिनेमाविषयी
शाहरुख खान ‘जवान’ (Shahrukh Khan Jawan) सिनेमाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो रिलीजच्या आठवडाभरापूर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. सिनेमातील अनेक गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्यांनाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. हे गाणे ट्रेंडिंग लिस्टमध्येही कायम आहेत.

या सिनेमाचे दिग्दर्शन ऍटली कुमार याने केले आहे. सिनेमात शाहरुखसोबतच नयनतारा, विजय सेतुपत आणि सान्या मल्होत्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमात दीपिका पदुकोण हिची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. (king shah rukh khan visit mata vaishno devi before jawan trailer launch video viral on social media)

हेही वाचा-
गंभीर आजाराचा सामना करतेय ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री; शाहरुखच्या ‘रईस’ अन् रणबीरमुळे आलीय वेळ
शाहरुख अन् सनीमधील भांडण संपलं! ‘Gadar 2’ पाहण्यापूर्वी ‘किंग’ खानने केलेला ‘पाजी’ला फोन

हे देखील वाचा