Monday, September 25, 2023

शाहरुख अन् सनीमधील भांडण संपलं! ‘Gadar 2’ पाहण्यापूर्वी ‘किंग’ खानने केलेला ‘पाजी’ला फोन

सध्या बॉलिवूड अभिनेता सनी देओलगदर 2‘ या ब्लॉकबस्टर सिनेमाचे यश साजरे करत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. सिनेमा लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी निर्मात्यांसोबतच चाहत्यांनाही आशा लागली आहे. फक्त चाहत्यांनीच नाही, तर समीक्षकांनीही सिनेमाचे कौतुक केले आहे. सनीचा सिनेमा पाहून चाहतेही स्वत:ला प्रशंसा करण्यापासून रोखू शकत नाहीयेत. सनी देओल आणि शाहरुख खान एकमेकांशी बोलत नसल्याचे बोलले जात होते. मात्र, ‘गदर 2’ची क्रेझ शाहरुखलाही सिनेमा पाहण्यापासून रोखू शकला नाही. शाहरुखने अलीकडेच सांगितले होते की, त्याने ‘गदर 2’ सिनेमा पाहिला आहे. आता यावर सनी पाजींचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

शाहरुखने ठेवले होते एसआरके सेशन
खरं तर, अलीकडेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आस्क एसआरके सेशन ठेवले होते. यादरम्यान त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती. यामध्ये एका चाहत्याने त्याला विचारले होते की, त्याने ‘गदर 2’ (Gadar 2) पाहिला आहे का? यावर शाहरुखने सिनेमाची प्रशंसा करत म्हटले होते की, “‘गदर 2’ खूप आवडला आहे.”

सनीची प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना सनी देओल शाहरुख खान (Sunny Deol Shah Rukh Khan) याच्याविषयी बोलताना म्हणाला, की त्याने सिनेमा पाहण्यापूर्वी फोन केला (Shahrukh Call Sunny Deol) होता. तसेच, अभिनंदनही केले होते. सनी म्हणाला, “शाहरुखने मला म्हटले की, मी खूपच खुश आहे आणि तू याचा हक्कदार आहेस.” यावेळी सनीने सांगितले की, त्याने शाहरुखसोबतच त्याची पत्नी गौरीसोबतही चर्चा केली. सनी असेही म्हणाला की, “आम्ही अनेकदा फोनवर बोललो आहोत. अनेक गोष्टींबाबत आम्ही विचार शेअर करतो.”

जुन्या गोष्टी विसरला सनी
शाहरुखसोबत झालेल्या वादाविषयी बोलताना सनी देओल म्हणाला की, “वेळ सर्वकाही ठीक करतो. असेच झाले पाहिजे.” खरं तर, शाहरुख खान आणि सनी देओल (Shah Rukh Khan And Sunny Deo) यांच्यातील हे शीतयुद्ध ‘डर’ या सिनेमापासून सुरू होते. या सिनेमात सनीने नायकाची, तर शाहरुखने खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र, खलनायकाला जास्त महत्त्व मिळाल्याने सनी आणि शाहरुखमध्ये भांडण झाले होते. अनेकदा दोघांनीही एकमेकांवर निशाणा साधला होता. मात्र, आता दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचे दिसत आहे. चाहतेही यामुळे आनंदात आहेत. (sunny deol revealed superstar shah rukh khan called him before watching gadar 2 read)

हेही वाचा-
सनीने जिंकली कोट्यवधी मने! विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत अभिनेत्याने साजरा केला रक्षाबंधन सण- व्हिडिओ
अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ बाबतीत बनला पहिला भारतीय सुपरस्टार, लगेच वाचा

हे देखील वाचा