पाहा ‘कातळवाडीची डिंपल कपाडिया अन् जॅकी श्रॉफ!’ ‘देवमाणूस’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल


एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. मात्र त्या व्यक्तीच्या चांगुलपणाच्या मागे राक्षसी चेहरा देखील असू शकतो, असे सांगणारी मालिका म्हणजेच ‘देवमाणूस’. झी मराठी या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेची लोकप्रियता या दिवसांत गगनाला भिडली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. मालिकेसोबत यातील कलाकारही घराघरात पोहचले आहेत. डॉ. अजितकुमार देव आणि डिंपलची केमिस्ट्री तर प्रेक्षकांकडून खूप पसंत केली जात आहे.

नुकताच या ऑनस्क्रीन जोडीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्या दोघांचा मजेदार अभिनय पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता की, यामध्ये किरण जेलमध्ये आहे आणि डिंपल त्याला भेटायला आलेली आहे. तेव्हा हे दोघे अभिनेते जॅकी श्रॉफ आणि डिंपल कपाडिया यांच्या ‘तेरा नाम लिया’ या गाण्यावर अभिनय करत आहेत.

वास्तविक हा व्हिडिओ मालिकेच्या सेटवरचा आहे. जो किरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही मालिकेच्या लूकमध्ये दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत किरणने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कातळवाडीची डिंपल कपाडिया आणि जॅकी श्रॉफ.” नेटकऱ्यांनी या व्हिडिओला भरभरून प्रेम दिले आहे.

अभिनेता किरण गायकवाडबद्दल बोलायचे झाले, तर तो यापूर्वी ‘लागीर झालं जी’ मध्ये दिसला होता. यातील त्याचे पात्र विशेष गाजले. नकारात्मक भूमिका असूनही, त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. आता त्याचे ‘देवमाणूस’ मधील पात्र देखील खूप पसंत केले जात आहे. शिवाय मालिकेतील सरू आजी, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा ही पात्रं सध्या रसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.