Friday, September 20, 2024
Home कॅलेंडर वाद मिटावे म्हणून राजेश खन्नांनी श्रीदेवी-जया प्रदाला दोन तास एकाच खोलीत कोंडलेले, बाहेर आल्यावर समजले…

वाद मिटावे म्हणून राजेश खन्नांनी श्रीदेवी-जया प्रदाला दोन तास एकाच खोलीत कोंडलेले, बाहेर आल्यावर समजले…

ऐंशी अन् नव्वदचे दशक गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आजही आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. या अभिनेत्रींमध्ये जया प्रदा आणि श्रीदेवी या दोघींचा प्रकर्षाने उल्लेख होतो. जयाप्रदा आणि अभिनेत्री श्रीदेवीसोबतचा त्यांचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. तो आज आपण या लेखात पाहणार आहोत. यासोबतच 13 ऑगस्ट श्रीदेवी यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने श्रीदेवीच्या आयुष्यातील किस्सेही जाणून घेऊया.

जयाप्रदा- श्रीदेवी 2 तास खोलीत बंद राहूनही एकमेकांशी बोलल्या नाहीत
त्याकाळात श्रीदेवीची स्पर्धा सर्वात जास्त जयप्रदा यांच्याशी असायची. दोघींनाही एकमेकांना पाहायला तर लांबच परंतु बोलयलाही आवडत नव्हते. एकदा दोघींमध्ये पॅचअप व्हावे या उद्देशाने राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी त्यांना 2 तास खोलीत बंद ठेवले. जेव्हा दार उघडले तेव्हा असे समोर आले की दोघी वेगवेगळ्या कोपऱ्यात बसल्या आहेत. एकाच खोलीत राहूनही दोघींनी एकमेकींकडे पाहिलेही नाही.

टॉप अभिनेत्री जयललितासोबत केले होते काम
श्रीदेवीने 1967 मध्ये ‘थुनाईवन’ या तमिळ चित्रपटात लॉर्ड मुरुगाची भूमिका साकारली होती. तेव्हा त्यांचे वय 4 वर्ष होते. या चित्रपटात त्यांनी तत्कालीन टॉप अभिनेत्री जयललिता यांच्याबरोबर काम केले होते. श्रीदेवीने 1975 मध्ये ‘ज्युली’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. यामध्ये त्या बाल कलाकार म्हणून दिसल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

गाण्याच्या शूटींगवेळी आला होता 103 डिग्री ताप
कामासाठी समर्पणाच्या बाबतीत श्रीदेवी इतर अभिनेत्रींपेक्षा नेहमीच पुढे असायच्या. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्या लंडनमध्ये शूटिंग करत होत्या. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच त्या भारतात परतल्या आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर ताबडतोब लंडनला रवाना झाल्या व शूटिंग सुरू केली. याशिवाय ‘चालबाज’च्या शूटिंगदरम्यान त्यांना 103 डिग्री तापही होता, पण तरीही त्यांनी विश्रांती न घेता पूर्ण उत्साहाने एका गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.

आईने 10 लाख फी मागितली, बोनीने श्रीदेवीला 11 लाखांसाठी केले साइन
बोनी कपूर यांनी श्रीदेवीला 70 च्या दशकात एका तमिळ चित्रपटात पाहिले होते. बोनी पहिल्या नजरेतच त्यांच्या प्रेमात पडले. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या कहाणीची सुरुवात मिस्टर इंडिया चित्रपटाने झाली. फक्त स्क्रिप्ट ऐकण्यासाठी श्रीदेवीने बोनीला 10 दिवस वाट पाहायला लावली होती. श्रीदेवीला साइन करण्याठी त्यांच्या आईने 10 लाख फी मागितली होती. कदाचित त्यांना प्रभावित करण्यासाठी बोनी म्हणाले, मी 11 लाख देईन.

जुरासिक पार्कसाठी स्पीलबर्गला दिला होता नकार
प्रसिद्ध दिग्दर्शक स्पीलबर्गने एका भूमिकेसाठी श्रीदेवीची निवड केली होती, परंतु श्रीदेवीने त्यांना थेट नकार दिला. श्रीदेवीने ज्यूरॅसिक पार्क या प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटाला नकार दिला, यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येऊ शकतो. श्रीदेवी यांना भारतीय चित्रपटांची आवड होती. त्यानंतरही त्यांना हॉलिवूड चित्रपटांकडून बर्‍याच ऑफर्स आल्या पण त्यामध्ये त्याने कोणताही रस दाखविला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-
श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये
हीच कामाप्रती खरी निष्ठा! 103 डिग्री ताप असूनही श्रीदेवीने केली होती गाण्याची शूटिंग, रंजक किस्सा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा