किती हजार कोटी संपत्तीचा मालक आहे राज कुंद्रा? आकडा वाचून सरकेल पायाखालची जमीन


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला राज कुंद्राला १९ जुलै रोजी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला अश्लील व्हिडिओ बनवून वेबसाईटवर प्रदर्शित करण्याच्या गुन्ह्याअंतर्गत राजला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल ऍप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात एका अभिनेत्रीला अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. राज कुंद्रा बिझनेस इंडस्ट्रीमधील एक मोठे आणि प्रतिष्ठित नाव आहे. कमाईच्या बाबतीतही राज कुंद्रा टॉपला आहे. आज आपण या लेखातून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि एकूण कमाई तसेच संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत.

राज कुंद्राचा जन्म लंडनमध्ये एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. मात्र, त्याचे मूळ गाव पंजाबमधील लुधियाना होते. त्याची आई एका स्टोरमध्ये सहाय्यक म्हणून काम करायची, तर त्याचे वडील लंडनमध्ये बस कंडक्टर होते. त्याने त्याचे शिक्षण अर्धवट सोडले आणि तो व्ययसायाकडे वळला. त्याच्या वडिलांनी त्यांना काम कर सांगितल्यावर काही पैसे घेऊन तो आधी नेपाळमध्ये पोहोचला आणि तिथे त्याला पशमीना शालींचा व्यायसाय आवडला.

उद्योजक असण्याने त्याची कलाकारांसोबत चांगली ओळख होती. त्यामुळे त्याने या शाली कलाकरांना विकण्यास सुरुवात केली आणि या व्यवसायात तो चांगला यशस्वी झाला. सोबतच त्याने वेगवेगळ्या देशांमध्ये इतर व्यवसायांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. त्याने दुबई गाठली आणि हिऱ्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू केले. पण त्यात त्याला यश आले नाही. एकीकडे शालींचा व्यवसाय उत्तम चालत असताना दुसरीकडे त्याने पुन्हा हिऱ्यांच्या व्यवसायासाठी प्रयत्न केले आणि या वेळेस त्याला यश मिळाले. राजने त्याच्या विविध व्यवसायांमध्ये इतके यश मिळवले आहे, की त्याची गणना जगातील टॉपच्या उद्योगपतींमध्ये होते. भारत, ब्रिटन, दुबई आदी अनेक देशांमध्ये त्याचा व्यवसाय पसरला आहे.

राज कुंद्राचा बिझनेस स्टील प्लांट, फॅशन इंडस्ट्री, रियल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आदी अनेक क्षेत्रांमध्ये आहे. एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, राज वर्षभरात जवळपास १०० मिलियन डॉलरच्या वर कमाई करतो. शिल्पा शेट्टीपेक्षा अनेक पटीने जास्त त्याची कमाई आहे. याचमुळे यशस्वी लोकांच्या यादीत राज सर्वात पुढे आहे. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत राजला १९८ वे स्थान मिळाले आहे. अंदाजानुसार राजचे २०२१ सालातले नेटवर्थ २९०० कोटी रुपयांचे आहे.

एका रिपोर्टनुसार २०१७ साली त्याची संपत्ती २३०० कोटी, २०१९ साली २३५० कोटी, २०२० मध्ये २५०० कोटी आणि २०२१ मध्ये २९०० कोटी इतकी वाढली आहे. राज विविध खेळांच्या टीम विकत घेतो आणि स्पॉन्सरही करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजेंद्र कुमारांना साकारायची होती अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील ‘ही’ भूमिका; पण…

-राज कुंद्राचे व्हाट्सऍप चॅट आले समोर; ग्रुप ‘एच’च्या माध्यमातून व्हायचे अश्लील चित्रपटासंबंधित सर्व व्यवहार

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.