बाबो! ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे राखी सावंत; स्टेज शोमधून करते सर्वाधिक कमाई


बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून अभिनेत्री राखी सावंत ओळखली जाते. राखी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती प्रत्येक गोष्टींवर आपले स्पष्ट आणि परखड मत मांडते. वाद, व्हिडिओ, किस्से आदींमुळे राखी ओळखली जाते. राखीच्या वागण्यावरून बऱ्याच जणांना राखी मूर्ख, वेडी आणि मीडिया अटेंशनसाठी आसुसलेली वाटत असेल, पण असे नाहीये. वरून ती कशीही दिसत अथवा वाटत असली, तरीही ती अतिशय हुशार आणि व्यवहारी आहे.

तुम्हाला माहित आहे का? अनेकदा काम नसल्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगणारी राखी, कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. हो, आता जरी राखी चित्रपटांमध्ये, कार्यक्रमांमध्ये कमी दिसत असली, तरीही तिच्याकडे भरपूर संपत्ती आहे.

राखीने हिंदी इंडस्ट्रीसोबतच, मराठी, तमिळ आणि तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. शिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. शिवाय ती टेलिव्हिजन क्षेत्रात देखील बऱ्याच शोमध्ये दिसली आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला राखीच्या संपत्तीबद्दल माहिती देणार आहोत.

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, राखीकडे एकून ३७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. राखीचे मुंबईमध्ये काही फ्लॅट्स असून यात अंधेरी आणि जुहूमध्ये प्रत्येकी २-२ फ्लॅट्सचा समावेश आहे. शिवाय राखीकडे ११ कोटींचा एक बंगला सुद्धा आहे. यासोबतच तिच्या अनेक पॉश आणि लक्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्याकडे पोलो, फोर्ड एंडेवर कार आदी अनेक गाड्या आहेत.

राखी नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस १४’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोमध्ये ती १४ लाख रुपये घेऊन बाहेर पडली. राखीकडे येणारे पैसा हा जास्तकरून तिच्या स्टेज शोमधून येतो. राखीने ‘अग्निचक्र’ सिनेमातून हिंदी चित्रपटांमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने तिच्या धमाकेदार आयटम सॉंग्सने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

टीव्हीच्या दुनियेत राखीचा सन २००९ सालचा ‘राखी का स्वयंवर’ हा शो खूप गाजला. याच शो मध्ये तिने एका NRI मुलाशी लग्न देखील केले होते. मात्र, हे सर्व खोटे खोटे असल्याचा खुलासा नंतर तिने केला होता. यासोबतच राखीने अनेक रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. राखीने रितेश नावाच्या एका NRI मुलासोबत लग्न केल्याची माहिती मिळाली होती. मात्र, नुकतेच तिने सांगितले की, तिचे लग्न जबरदस्ती झाले आहे. लग्नानंतर तिचा पती तिला सोडून पळून गेला. खरं काय आहे हे कोणालाच माहिती नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…आणि अशाप्रकारे नेहाला मिळाली होती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘अंजली भाभी’ची भूमिका

-‘लंबी रेस का घोडा’ समजल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने दिले फक्त ३ हिट सिनेमे; अर्थशास्त्रात मिळवले होते ‘गोल्ड मेडल’

-चित्रपटात येण्यापूर्वी वेट्रेस होती ‘फॅशन दिवा’ सोनम; अभिनय नव्हे, तर ‘या क्षेत्रात करायची होती तिला कारकीर्द


Leave A Reply

Your email address will not be published.