भाईचा बॉडीगार्ड! तब्बल २४वर्ष सलमानसोबत सावलीप्रमाणे राहिलेला शेरा घेतो महिन्याला इतका पगार


बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमानची चाहत्यांमध्ये एक वेगळीचे क्रेझ आहे. तो त्याचे चित्रपट, त्याचे यश, त्याची फॅन फॉलोविंग हे सर्व सगळ्यांनाच माहित आहे. तो पडद्यावर अनेकदा ऍक्शन हिरो किंवा रफ अँड टफ अशा भूमिका साकारत असतो. मात्र तो त्याच्या वैयक्तिक जीवनात त्याच्या जवळच्या लोकांबद्दल खूपच हळवा आणि प्रेमळ आहे. सलमान त्याच्या मैत्रीसाठी देखील ओळखला जातो. सलमानबद्दल सांगायचे झाले तर तो मित्रांसाठी, त्याच्या जवळच्या लोकांसाठी जीवही देऊ शकतो, आणि दुश्मनांकडे फिरकूनही बघत नाही. तो त्याची मैत्री मनापासून निभावत आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा माणूस जपत असतो.

सलमान अनेकदा त्याच्या कुटुंबासोबत दिसतो, मुलाखतींदरम्यान बऱ्याचदा कुटुंबातील व्यक्तीबद्दल तो सांगत असतो. मात्र त्याच्या आयुष्यामध्ये असा एक व्यक्ती आहे जो कदाचित त्याच्या कुटुंबातील व्यक्तींपेक्षा जास्त सलमानसोबत अगदी त्याची सावली बनून मागील अनेक वर्षांपासून आहे. तो आहे सलमानचा बॉडीगार्ड शेरा. सलमानसाठी सुद्धा शेरा कुठल्या कुटुंबापेक्षा कमी नाहीये. सलमान देखील शेरासाठी अनेक गोष्टी करताना दिसतो. नुकताच सलमानने सोशल मीडियावर शेरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमान आणि शेरा पगडीमध्ये असून सलमान शेराच्या खांद्यावर हात ठेऊन उभा दिसतोय. सलमानने या फोटोला दिलेले शीर्षक खूपच बोलके आहे. त्याने या फोटोला कॅप्शन दिले – ‘प्रामाणिकपणा’. या कॅप्शनवरुन सलमानचा शेरावर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून येते. सलमान खान जिथे कुठे जातो, त्याचा बॉडीगार्ड शेरा नेहमी त्याच्यासोबत असतो.

मागील २४ वर्षांपासून शेरा सलमानसोबत सावलीसारखा उभा आहे. गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा हा सलमान खानसाठी एक कर्मचारी नाही तर कुटूंबातील सदस्य झाला आहे. शेरा बॉलिवूडमधील लोकप्रिय बॉडीगार्ड झाला असून आता त्याला देखील लोकं ओळखतात. आज या लेखातून जाणून घेऊयात त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी

सलमान खानला जेव्हा एखाद्या ठिकाणी जायचे असते तेव्हा शेरा त्या ठिकाणी एकदिवस आधीच पोहचतो. तिथल्या संपूर्ण परिस्थितीची माहिती तो काढतो. बऱ्याचदा त्याला रस्ता क्लिअर करण्यासाठी पाच-पाच किलोमीटर इतके पायी चालावे लागते. एकदातर शेरा रस्ता क्लिअर करण्यासाठी तब्बल ८ किलोमीटर पायी चालला होता. प्राप्त माहितीनुसार सलमान शेराला सुरक्षा देण्याच्या बदल्यात वर्षाला २ कोटी रुपये घेतो. म्हणजे त्याला महिन्याचे १६.५० लाख रुपये मिळतात.

शेराला बालपणीपासूनच बॉडी बिल्डींगची आवड होती. त्यामुळेच तो १९८७ मध्ये ज्यूनिअर मिस्टर मुंबई आणि ज्यूनिअर वर्गात मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवडला गेला. शिख कुटुंबात जन्मलेल्या शेराच्या वडिलांचे मुंबईमध्ये गाडी रिपेअर करण्याचे वर्कशॉप होते. मात्र एकुलत्या एक शेराने खूपच वेगळे क्षेत्र निवडले. त्याने त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून सिनेसृष्टीतील कलाकार आणि बिझनेमन यांच्या सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला शेरा काही बॉलिवूड कलाकारांसोबत हॉलिवूड कलाकारांनासुध्दा भारतात शूटिंगला आल्यानंतर सुरक्षा देऊ लागला.

१९९५ साली सोहेल खानने शेराकडे सलमानच्या परदेश दौ-यासाठी सुरक्षा मागितली. त्याच्या कामाने प्रभावित झालेल्या सलमानने त्याला नेहमीसाठी आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवले. त्यानंतर तो सलमानच्या घरातलाच सदस्य बनला. सलमानला चाहत्यांच्या गर्दीतून सुरक्षित बाहेर काढताना शेराला आपल्या डोक्यावरील पगडी अडथळा निर्माण करत असल्याचे जाणवले. त्याने कर्तव्य प्रामाणिकपणे निभाविण्यासाठी आपल्या केसांची कुर्बानी देखील दिली.

शेराच्या म्हणण्यानुसार तो सलमानच्या पाठीशी एका मित्राप्रमाणे असतो. शेरा मुंबईमध्ये सलमानच्या शेजारी राहायचा. यानंतर तो सलमान खानचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या सांगण्यावरुन शेराने विजक्रॉफ्ट इव्हेंट कंपनी उघडली. यासोबतच ‘टायगर सिक्योरिटी’ ही त्याची एक कंपनी आहे, ही कंपनी स्टार्सला सुरक्षा पुरवते. शेरा भारतात येणा-या हॉलिवूड स्टार्सला सुद्धा सुरक्षा देतो.

शेराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ‘मी भाईसारखी फॅन फॉलोइंग कधीच दुसऱ्या कोणत्या कलाकारासाठी पाहिली नाही. सलमान भाईने आम्हाला नेहमी सांगितले आहे की, गर्दीत कुणीही असले तरी त्यांना इजा होऊ नये. भाईचे चॅरिटी आणि कुटूंबावर खुप प्रेम आहे.”


Leave A Reply

Your email address will not be published.